आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई:भारतात 20 लाख अकाउंट्स केले बंद, स्पॅम आणि नको असलेले मेसेजेस रोखण्यासाठी कारवाई

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने ऑगस्टमध्ये भारतातील 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. भारताच्या आयटी नियमांचे आणि व्हॉट्सअ‍ॅप सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मासिक अनुपालन अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

46 दिवसांच्या आत 3 लाख खाती बंद
व्हॉट्सअॅपने भारतात 16 जून ते 31 जुलैपर्यंत 3 लाख खाती बंद केली होती. 594 तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जगभरात सरासरी 8 कोटी खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅप बंदी घालतो.

तक्रारीच्या आधारावर कारवाई
परवानगीशिवाय स्वयंचलित किंवा बल्क संदेश पाठवण्यासाठी 20 लाख 70 हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपला 420 तक्रारी आल्या होत्या. यामध्ये अकाउंट सपोर्टच्या 105 तक्रारी, बंदी अपीलच्या 222, प्रॉडक्ट सपोर्टच्या 42, सिक्युरिटीच्या 17 आणि इतर सपोर्टच्या 34 तक्रारींचा समावेश आहे.

गैरवापर टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूजर सिक्युरिटी रिपोर्टमध्ये तक्रारी देण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आपली कारवाई सुरू ठेवेल. प्लॅटफॉर्मवर स्पॅम आणि नको असलेले संदेश रोखण्यावर आमचा भर आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या सपोर्ट पेजमध्ये म्हटले आहे की ते तक्रार चॅनेलद्वारे वापरकर्त्यांच्या तक्रारींची नोंदणी करते. मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर हानिकारक वर्तन टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आणि संसाधने वापरते.

नवीन आयटी नियमांनुसार, दर महिन्याला अहवाल प्रकाशित करणे आवश्यक
भारत सरकारने 26 मे रोजी नवीन आयटी नियम लागू केले होते. या नियमांनुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेले कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या आधारे केलेल्या कारवाईची माहिती द्यावी लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याची माहिती वाचत नाही
व्हॉट्सअ‍ॅपने यावर जोर दिला आहे की तो कोणत्याही वापरकर्त्याचे संदेश वाचत नाही. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये, वापरकर्त्याची माहिती संरक्षित आहे. प्लॅटफॉर्म ऑपरेशनसाठी उपलब्ध नसलेल्या एनक्रिप्टेड माहितीवर अवलंबून आहे. यामध्ये यूजर रिपोर्ट, प्रोफाइल फोटो, ग्रुप फोटो आणि ग्रुप डिस्क्रिप्शन सामिल आहे.

बातम्या आणखी आहेत...