आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या वादामुळे व्हाट्सएप मेसेजिंग अॅपने आता प्रायव्हसी अपडेट योजना पुढे ढकलली आहे. आता 8 फेब्रुवारीला कोणतेही व्हॉट्सअॅप खाते बंद होणार नाही. कंपनी हळूहळू 15 मे पर्यंत पॉलिसी लागू करेल. कंपनीचा असा विश्वास आहे की पॉलिसीची मुदतवाढ दिल्यास वापरकर्त्यांना ती समजून घेण्यासाठी वेळ मिळेल. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी फेसबुकने म्हटले आहे की अॅपच्या नवीन अपडेटविषयी लोकांना खूप गैरसमज आहेत, ज्यामुळे या क्षणी नवीन अपडेट थांबवण्यात आले आहे.
ब्लॉगद्वारे पॉलिसी पुढे ढकलण्याची घोषणा केली
कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही ती तारीख पुढे ढकलत आहोत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना धोरण आणि शर्ती वाचण्यास आणि स्वीकारण्यास सांगितले जाईल. 8 फेब्रुवारी रोजी कोणतेही खाते डिलीट किंवा सस्पेंड केले जाणार नाही. आम्ही आमच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणाबद्दल स्पष्ट माहिती देऊ आणि लोकांमधील गोंधळ दूर करू. यानंतर, कंपनी हळूहळू नवीन धोरणाबद्दल लोकांचे मत विचारेल. यासाठी 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.'
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार प्रायव्हसी अपडेट जाहीर झाल्यानंतर बर्याच यूजर्स आणि अनेक मीडिया संस्थांनी याचा अर्थ माहितीचा दुरुपयोग असा काढला. त्यांनी म्हटले होते की, नवीन धोरणानंतर व्हॉट्सअॅप लोकांची चॅट आणि इतर वयक्तिक डेटा वाचू शकेल.
सिग्नल अॅपच्या वाढीचा परिणाम कंपनीवर झाला आहे
व्हॉट्सअॅपच्या नवीन धोरणाची घोषणा झाल्यानंतर लोक सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या इतर मेसेजिंग अॅप्सकडे जात आहेत. या आठवड्यात, सिग्नल भारतातील प्रथम क्रमांकाचा मॅसेंजिंग अॅप बनला आहे. लोकांना या समस्यांबाबत आश्वासन देताना व्हॉट्सअॅपने सांगितले की, 'नव्या अपडेटनंतर लोकांकडे अनेक पर्याय असतील. आपल्याला फक्त एक बिझनेसला मॅसेज करावा लागेल आणि व्हॉट्सअॅप आपला डेटा कसा वापरतो हे आपल्याला अगदी पारदर्शक पद्धतीने स्पष्ट केले जाईल.
सध्याच्या काळात खूप कमी लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरेदी करतात. भविष्यात अशा लोकांची संख्या वाढणार आहे आणि हे चांगले आहे की, लोक आत्तापासूनच याविषयी जागरुक आहेत. हे अपडेट कोणत्याही पध्दतीने आम्हाला तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर करण्याची परवानगी देत नाही'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.