आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुप्रीम कोर्टाने सोमवारी व्हॉट्सअॅपला म्हटले की, तुमच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे भारतीयांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक शंका व्यक्त होत आहेत. चीफ जस्टिस एसए बोबडे म्हणाले की, तुम्ही अब्जावधी डॉलरची कंपनी आहात, पण लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा जास्त महत्वाचे आहे. बोबडे यांनी या प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे.
नवीन पॉलिसीबाबत लोकांच्या मनात शंका
न्यायालयाने जेष्ठ वकील श्याम दीवान यांच्या त्या याचिकेचे समर्थन केले, ज्यात त्यांनी म्हटले होते की, भारतात डेटा प्रोटेक्शनबाबत कोणताच कायदा नाही. चीफ जस्टिस बोबडे, जस्टिस एएस बोपन्ना आणि जस्टिस वी रामासुब्रमण्यम म्हणाले की, दीवान यांच्या युक्तीवादाने आम्ही प्रभावित झालो. अशाप्रकारचा कायदा करायला हवा. व्हॉट्सअॅप आपल्या नवीन पॉलिसीनंतर भारतीयांचा डेटा शेअर करेल, परंतु याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे.
यूरोपीय नियमांवर कोर्टाचा प्रश्न आणि वॉट्सअॅपचे उत्तर
सुप्रीम कोर्टाने यूरोपच्या तुलनेत भारतात प्रायव्हसी स्टँडर्ड कमी केल्या आरोपांवरुन व्हॉट्सअॅपला उत्तर मागितले आहे. व्हॉट्सअॅपने यावर सांगितले की, युरोपमध्ये यासाठी विशेष कायदा आहे. जर भारतात असा कायदा आला, तर आम्ही त्याचे पालन करू.
काय आहे व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी ?
व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीनुसार, युजर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसीव्ह करणार, त्याचा कंपनी कुठेही वापर करू शकते. कंपनी त्या माहितीला कुठेही शेअर करू शकणार. ही पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार होती, पण प्रचंड विरोध झाल्यानंतर तारीख वाढवून 15 मे करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.