आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप त्याच्या वादग्रस्त गोपनीयता धोरणाबाबत बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. कारण व्हॉट्सअॅपने नुकतेच गोपनीयता धोरणाला स्थगिती दिल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे. व्हॉट्सअॅपने न्यायालयात सांगितले की, जोपर्यंत डेटा संरक्षण कायदा लागू होत नाही तोपर्यंत वापरकर्त्यांना गोपनीयता धोरण अवलंबण्यास भाग पाडले जाणार नसल्याचे सांगितले आहे.
CCI ने गोपनीयतेबाबत मागीतली होती माहिती
सीसीआयने गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅप आणि फेसबूकला नोटीस जारी करत त्यांच्या गोपनीयता धोरणाबाबत माहिती मागितली होती. व्हॉट्सअॅपने याविरोधात सिंगल न्यायाधीशाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली होती. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपने या निर्णयाचा विरोध केला होता.
व्हॉट्सअॅप युजर्संना सक्ती करत आहे - केंद्र
केंद्र सरकारनेदेखील व्हॉट्सअॅपच्या या गोपनीयता धोरणाला न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर विरोध दर्शवला होता. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना या धोरणाबाबत सक्ती करत असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते. त्यासोबतच व्हॉट्सअॅप दररोज आपल्या युजर्संना या नोटिफिकेशन्सद्वारे संदेश पाठवत असल्याचे ते म्हणाले होते.
मे महिन्यात लागू केले होते नवीन पॉलिसी
व्हॉट्सअॅप हे धोरण फेब्रुवारी महिन्यात लागू करणार होता. परंतु, नंतर यावर युजर्संच्या सुरक्षिततेबाबत तज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर मे महिन्यात युजर्संसाठी नवीन गोपनीयता धोरण लागू केले.
लोकांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य - व्हॉट्सॲप
केंद्र सरकारने न्यायालयात शपथपत्र दाखल केल्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपच्या वतीने निवेदन काढण्यात आले आहे होते. यात म्हटले आहे की, लोकांच्या (युजर्स) गोपनीयतेला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पुढेही राहील. कंपनीने सरकारलाही हे सांगितले होते.
व्हॉट्सॲपचे नवीन धोरण काय आहे?
व्हॉट्सअॅपच्या नवीन नियम व गोपनीयता धोरणानुसार, आपण व्हॉट्सअॅपवर पाठवत असलेले कंटेंट, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसीव्ह करतो कंपनी त्या कंटेंटचे कुठेही वापर, रिप्रोड्यूस, वितरित किंवा प्रदर्शित करु शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.