आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअपचे नवीन अ‍ॅप:यामध्ये मॅक OS आणि विंडोज यूजर्ससाठी ड्राइंग फीचर मिळेल, स्काइप सारखा अनुभव असेल

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

Android आणि iOS साठी WhatsApp दररोज बदल करत राहते. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप मॅक ओएस आणि विंडोज यूजर्ससाठी नवीन अ‍ॅप विकसित करत आहे. व्हॉट्सअप फीचर्च अपडेटची माहिती देणाऱ्या WABetaInfo पोर्टलने इटालियन ब्लॉगर एगियोर्नामेंटी लूमियाचा हवाला देत सांगितले की, व्हॉट्सअप विंडोज यूजर्ससाठी नवीन अ‍ॅप डेव्हलप करत आहे.

सेक्शन दिसायला स्काईप अ‍ॅपसारखा दिसेल
युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्मवर आधारित हे अ‍ॅप असेल. हे दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व आवृत्त्यांसाठी असेल. व्हॉट्सअ‍ॅप विंडोज आणि मॅकसाठी विकसित करत असलेल्या अ‍ॅपमध्ये टच स्क्रीन डिस्प्ले असलेल्या डिव्हाइसवर ड्रॉइंग फीचर देखील समाविष्ट असेल. या अ‍ॅपचे अकाउंट्स, चॅट्स, नोटिफिकेशन्स, स्टोरेज आणि हेल्प सेक्शन 6 कॅटेगरी सेटिंग्जसह स्काईपसारखे दिसतात. याशिवाय, असे सांगितले जात आहे की मॅक OS साठी व्हॉट्सअ‍ॅप ची नवीन आवृत्ती आयपॅडओएस व्हर्जनसारखी असेल जी अलीकडेच पाहिली गेली होती.

व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन स्टेटसवरही काम करत आहे

Android साठी WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये आता विशिष्ट लोकांपासून तुमचा लास्ट सीन हाइड करण्याचा पर्याय आहे. अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप हे वैशिष्ट्य आणण्यासाठी काही महिन्यांपासून सक्रियपणे काम करत आहे आणि आता बीटा प्रोग्रामच्या त्या भागाच्या सबसेटसाठी लाइव्ह आहे. बीटा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी कंपनी लवकरच ते आणू शकते. यानंतर ते सर्व व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी अपडेट केले जाईल. हे फिचर WhatsApp यूसर्जना लास्ट सीन स्टेटसला सर्वांद्वारे, त्यांचे कॉन्टॅक्ट, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील खास लोकांची लिस्ट वगळता अजून कोणालाही पाहण्याची परमिशन देणार नाही.

कम्युनिटी फीचरवरही काम सुरू
दरम्यान एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअप एक नवीन कम्युनिटी फिचरवरही काम करत आहे, जे अ‍ॅडमिनला ग्रुपवर जास्त अधिकार देईल. रिपोर्टनुसार कम्युनिटी फीचर ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपवर जास्त पावर देते.

नवीन फीचरने अ‍ॅडमिनला कम्युनिटी इनव्हाइट लिंकच्या माध्यमातून नवीन यूजर्सला इनव्हाइट करणे आणि नंतर दुसऱ्या मेंबर्सला मॅसेज पाठवण्याची कॅपेसिटी ऑफर करण्याचा अंदाज आहे. हे फीचर व्हॉट्सअपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.21.21.6 मध्ये दिसले आहे. मॅसेजिंग अ‍ॅपच्या आतच फेसबुक ग्रुप प्रमाणे एक सोशल मीडिया सारखे फंक्शन असण्याचीही शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...