आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाच्या किमतीत घट:सात दिवसांत 10 % घटले गव्हाचे भाव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ७ दिवसांत गव्हाच्या किमतीत १० टक्के घट झाली. सरकारने शुक्रवार जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) द्वारे खुल्या बाजारात गहू विकल्यामुळे ही किमत कमी झाली. एफसीआयने आतापर्यंत फ्लोर मिलर्ससह इतर घाऊक विक्रेत्यांना ई-लिलावाद्वारे ९.२ लाख टन गहू विकला. या आठवड्यात एफसीआययद्वारे खुल्या बाजारात घाऊक गव्हाच्या विक्रीचा सरासरी भाव २,४७४ रुपये प्रति क्विंटल होता. देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे बफर स्टॉकमधून ३० लाख टन गहू विकण्याची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...