आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wheat Production In The Country Is Expected To Decline By 5.7%, The Central Government Estimates

वाढत्या उष्णतेचा परिणाम:देशात गव्हाचे उत्पादन 5.7 % पर्यंत घटणार, केंद्र सरकारने वर्तवला अंदाज

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज ५.७% नी घटवला आहे. आधी २०२१-२२ या हंगामात ११.१३ कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज होता, पण वाढत्या उष्णतेमुळे पिकावर झालेल्या परिणामामुळे आता सुमारे १०.५० कोटी टन एवढेच उत्पादन होईल, असा अंदाज आहे. गेल्या हंगामात १०.९५ कोटी टन गहू उत्पादन झाले होते.

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा सचिव सुधांशू पांडेय यांनी सांगितले की, सध्या गहू निर्यातीवर नियंत्रणाचा कुठलाही विचार नाही. २०२२-२३ मध्ये सरकारी गहू खरेदी १.९५ कोटी टनांपर्यंत होऊ शकते, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. आतापर्यंत १.७५ कोटी टनांपर्यंत खरेदी झाली आहे. सरकारने या हंगामासाठी ४.४४ कोटी टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी खाद्यान्नाची मागणी पूर्ण करण्यात कुठलीही कमतरता भासणार नाही. गहू निर्यातीवर नियंत्रण आणण्याऐवजी सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. इजिप्त, तुर्की आणि काही युरोपीय देशांचे बाजार भारताच्या गव्हासाठी खुले होत आहेत. या तिमाहीत ४० लाख टन गहू निर्यातीसाठी व्यापाऱ्यांशी करार झाले आहेत. १० लाख टन गहू पाठवण्यात आला आहे. जूनमध्ये अर्जेंटिनाचा गहू येईपर्यंत भारताच्या व्यापाऱ्यांसाठी संधी आहे.

सरकारी खरेदीचा अंदाज का घटला?
खुल्या बाजारात किमान हमी भावापेक्षा जास्त दर मिळाल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्राऐवजी खुल्या बाजारात आपले धान्य विकत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या खाद्यान्न संकटामुळे गव्हाची मागणी आणि दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी साठा करत आहेत. प्रचंड उष्णतेमुळे काही राज्यांत उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...