आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wheat Production Is Expected To Decrease By 10 To 20 Lakh Tonnes This Year Due To Unseasonal Weather

बेमोसमीचा फटका:यंदा गव्हाचे उत्पादन 10 ते 20 लाख टनांनी घटण्याचा अंदाज; FCI कडून आजवर केवळ 7 लाख टन गहू खरेदी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेमोसमी पावसामुळे या वर्षी देशातील गहू उत्पादनात १० ते २० लाख टनांची घट होऊ शकते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) च्या अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. असाच अंदाज पीठगिरणी मालकांनी केलेल्या एका खासगी अभ्यासात वर्तवला होता. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनुसार एकूण उत्पन्न पहिल्या अंदाजानुसार अजूनही ११ कोटी २० लाख टनांपर्यंत असेल.

इंडियन अॅग्री बिझनेस सिस्टिम्स लि. आणि रोलर पीठ मिलर्ससाठी अॅग्रीवॉचने केलेल्या अभ्यासात म्हटले की, बेमोसमी पावसानंतरही गव्हाचे उत्पादन १० कोटी ३० लाख टन राहील. बेमोसमी पावसापूर्वी हे उत्पादन सुमारे १० कोटी ४० लाख टन होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

सरकारने फेब्रुवारीत जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले होते की, या वेळी ११ कोटी २० लाख टनांहून अधिक गव्हाचे या वर्षी बेमोसमी पावसामुळे १० ते १३ लाख टन उत्पादन घटू शकते.

गतवर्षीपेक्षा जास्त उत्पादन : केंद्र
अन्न मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुबोधसिंह यांनी म्हटले की, गारपिटीने १० ते २० लाख टन गव्हाचे नुकसान होईल. पण या वर्षी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ५०-५५ लाख टन अधिक उत्पादन होईल.