आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When China Warned World, There Were Only 34 Cases Of Corona, Cases Increased By 45 Thousand Times In The Last Hundred Days

कोरोनाचे 100 दिवस:जेव्हा चीनने संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसबद्दल सतर्क केले होते, तेव्हा फक्त 34 रुग्ण होते; मागील 100 दिवसात 45 हजार पट वाढले

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 डिसेंबर 2019 ला चीनने डब्ल्यूएचओला कोरोना व्हायरसबद्दल सतर्कतेचा इशारा दिला होता
  • चीनमध्ये पहिला बळी 9 जानेवारीला गेला, 3 महीन्यात जगभरा 89 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले

2020 ची सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 31 डिसेंबर 2019 ला कोरोना व्हायरसशी सुरुवात झाली होती. या व्हायरने अवघ्या शंभर दिवसात जगभर आपला हाहाःकार माजवला आहे. चीनने 31 डिसेंबरला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझशनला या नव्या आजाराबद्दल सतर्क केले होते. तेव्हा चीनमध्ये कोरोनाचे फक्त 34 प्रकरण होते. मागील शंभर दिवसात ही प्रकरणे 45 हजार पट वाढले आहेत. या व्हायरसचा पहिला बळी चीनमध्ये 9 जानेवारीला गेला. आता तीन महिन्यात जगभरात 89 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत 15 लाख 32 हजार 440 पेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाली आहे. सध्या अब्जावधी लोक आपापल्या घरात कैद झाले आहेत. या व्हायरसमुळे सर्वात जास्त बळी इटलीमध्ये गेले. विशेष म्हणजेच इटलीमध्ये या व्हायरसची सुरुवात 55 व्या दिवशी (23 फेब्रुवारी 2020)ला झाली. त्यावेळेस इटलीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 45 दिवसात 17 हजार 670 जणांचा मृत्यू झाला. भारतात व्हायरसचा पहिला बळी 11 मार्चला गेला होता. जाणून घ्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जगभरात काय घडामोडी घडल्या.

दिवस-1, केस- 34 (31 डिसेंबर 2019)

चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)ला पहिल्यांदा अलर्ट केले होते की, त्यांच्या देशात एक नवीन व्हायरस आला आहे. परंतू, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वुहानमध्ये निमोनियाचे अनेक प्रकरणे समोर आले होते, पण 31 डिसेंबरला संपूर्ण जगाचे लक्ष या नवीन आजारावर गेले.

दिवस-10, केस- 63 (9 जानेवारी 2020) 

या व्हायरसमुळे चीनमध्ये पहिला बळी गेला. परंतू, चीनने याची घोषणा दोन दिवसानंतर केली.

दिवस-24, केस-654 (23 जानेवारी 2020)

चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहानला लॉकडाउन केले. डब्ल्यूएचओने या व्हायरसचे ह्यूमन टू ह्यूमन ट्रांसमिशनचे पुरावे पाहीले.
 
दिवस-32, केस-9,927 (31 जानेवारी 2020)

चीनमधून हा व्हायरस ब्रिटेनमध्ये पोहचला. 31 जानेवारीला ब्रिटेनमध्ये पहिला कोरोना संक्रमित रुग्ण आढळला.
 
दिवस-43 , केस-44,802 (11 फेब्रुवारी 2020) 

या नवीन कोरोना व्हायरसचे नाव कोव्हिड-19 ठेवण्यात आले.
 
दिवस-46, केस- 66,885 (14 फेब्रुवारी 2020)

आफ्रीका खंडात पहिला रुग्ण आढळला आणि फ्रांसमध्ये या व्हायरसमुळे पहिला बळी गेला.
 
दिवस-55, केस- 78,958 (23 फेब्रुवारी 2020)  

इटलीमध्ये या व्हायरसमुळे तीन जणांचे मृत्यू झाले. यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांनार रद्द करण्यात आले.

दिवस-69, केस- 109,821 (8 मार्च 2020)

इटलीमधील सर्वात जास्त कोरोना संक्रमित क्षेत्र लोम्बार्डीला लॉकडाउन करण्यात आले. यासोबतच इराणमध्येही कोरोनाने थैमान घातला.

दिवस-72, केस- 125,875 (11 मार्च 2020)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या आजाराला जागतिक महामारी घोषित केले.
  
दिवस-76, केस- 167,454 (15 मार्च 2020)

स्पेनमध्ये पहिल्यांदा एका दिवसात 100 मृत्यू झाले. 

दिवस-86, केस- 467,653 (25 मार्च 2020)

भारतात टोटल लॉकडाउन घोषित करण्यात आले आणि देशातील 130 लोक घरात कैद झाले. 

दिवस-94, केस- 1,013,320 (2 एप्रिल 2020)

जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त झाली. तसेच, मृतांची संख्या 75 हजारांवर गेली.

दिवस-100, केस- 1,511,104 (8 एप्रिल 2020)

जगभरात या व्हायरसमुळे 89 हजारांपेक्षा जास्त मृत्यू तर 15 लाखांपेक्षा जास्त संक्रमित झाले.
(डेटा स्रोत- जॉन हॉपकिंस वेबसाइट)

आता पुढील 100 दिवसात काय घडू शकते ?

आता इटली आणि स्पेनमध्ये मृतांच्या संख्येत घट झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच, देशातील संक्रमितांची संख्याही कमी होत आहे. परंतू, ब्रिटेन आणि अमेरिका इटलीपेक्षा दोन आठवडे मागे आहेत. या दोन देशात सध्या इटलीसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. भारतामध्येही संक्रमणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप या आजारावर कोणतेच औषध निघाले नाही. सध्या जगभरातील 40 पेक्षा जास्त औषधांवर चाचण्या केल्या जात आहेत. आशा केली जात आहे की, पुढील शंभर दिवसात कोरोनावर उपचार निघेल.

बातम्या आणखी आहेत...