आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Sidhu Was Born, I Was At The Border: Amarinder; I Am Thick Skinned: Navjayetsingh

पॉलिटिकल शॉट:सिद्धू जन्मले तेव्हा मी सीमेवर हाेताे : अमरिंदर; मी तर जाड कातडीचा : नवज्याेतसिंग

अमृतसर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवज्योतसिंग सिद्धू यांनी बॅटिंग स्टाइलमध्ये शुक्रवारी पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. दीर्घकाळापासून सुरू असलेला अबोला आणि नाराजीनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंगही या कार्यक्रमाला हजर राहिले. सिद्धू आपल्या भाषणात म्हणाले की, ‘माझे हृदय पक्षाच्या हृदयासारखे नाही. जे माझा विरोध करतील, ते मला आणखी मजबूत बनवतील. मी जाड कातडीचा आहे. कोणी काही म्हटल्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. ’ कार्यक्रमात व्यासपीठावर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि माजी अध्यक्ष सुनील जाखडही होते. पदभार ग्रहण केल्यानंतर सिद्धू यांनी आक्रमकपणे भाषण दिले. जेव्हा ते भाषण देण्यास उभे राहिले तेव्हा त्यांनी शॉट मारल्याची अॅक्शन केली. ते म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्र्यांसाेबत खांद्याला खांदा लावून काम करेन. मला काेणताही अहंकार नाही.’

माझी आई आणि तुमच्या वडिलांनी सोबत काम केले
कॅप्टन अमरिंदर यांनी सिद्धू आणि आपल्या नात्याबाबत सांगितले की, ‘जेव्हा सिद्धू जन्मले होते तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबाला ओळखतो. सिद्धू यांचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर तैनात होतो. माझी आई आणि सिद्धू यांच्या वडिलांनी सोबत काम केले.

बातम्या आणखी आहेत...