आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • When The Earthquake Hit, Narendra Modi Had Asked His Family About The 'toran' Of Vadnagar; Big Brother Expressed Modi's Patriotism

एक्सक्लूसिव इंटरव्ह्यू:भूकंप आला तेव्हा नरेंद्र मोदींनी कुटुंबियांपूर्वी वडनगरच्या 'तोरण'बद्दल विचारले होते; मोठ्या भावाने सांगितले मोदींचे देशप्रेम

वडनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींच्या वडनगरवरील प्रेमाबद्दल बोलताना सोमाभाईंना अश्रू अनावर झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःपेक्षा, कुटुंबापेक्षा देशाला प्राध्यान्य दिले आहे, असे नरेंद्र मोदींचे मोठे भाऊ सोमाभाई यांचे म्हणने आहे. सोमाबाई सध्या गुजरातच्या वडनगरमध्ये वृद्धाश्रम चालवतात. दैनिक भास्करची टीमने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. देशाच्या पंतप्रधानांचे भाऊ असूनही ते एकदम साध्या पद्धतीने राहतात. ते एकाल हान खोलीत साधारण पलंगावर बसतात, शेजारी चार खुर्च्या ठेवल्या होत्या. आम्ही त्यांना आमचा परिचय दिल्यावर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचे आदरआतिथ्य केले. आम्ही आज येथे मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या भावासोबत झालेले खास संभाषण सादर करत आहोत...

26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये भयानक भूकंप आला होता. इथली गावच्या गाव उद्धस्त झाली होती. त्यावेळी आमचे कुटुंब गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. मी वडनगरमध्ये राहत असे, म्हणून कुटुंब माझ्याबद्दल चिंतीत होते. मी मुलगा व सून यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलणे मला शक्य झाले नाही. शेवटी मी नरेंद्रला फोन केला.

वडनगर तोरण
वडनगर तोरण

मी त्याला सांगितले की गुजरातमध्ये एक भयंकर भूकंप आला आहे आणि कुटूंबातील कुणालाही संपर्क साधता येत नाहीये. मी इतके बोलताच नरेंद्र मोदी म्हणाले की 'तोरण' ठीक आहे ना ? खरत, वडनगरची मुख्य ओळख इथले प्राचीन 'तोरण' आहे. तर यावरुन आपण अंदाज लावू शकता की मोदी आपल्या देशावर किती प्रेम करत असतील. कोण आपल्या कुटुंबापेक्षा अधिक जन्मस्थाना बद्दल काळजी करत.

मोदींच्या वडनगरवरील प्रेमाबद्दल बोलताना सोमाभाईंना अश्रू अनावर झाले

नरेंद्र मोदींचे वडनगरवरील प्रेम अजूनही लहानपणापासूनच अतूट आहे. यामुळे आज वडनगर वेगळे आहे. जुन्या वडनगरबद्दल बोलताना सोमाभाईच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले की आज वडनगर पहा, इथले रस्ते बघा. नरेंद्र मोदींनी वडनगरचा विकास करण्याचा संकल्प साकार केला आहे. शिक्षणाबरोबरच वडनगर आरोग्याच्या क्षेत्रात पुढे जात आहे. एवढेच नव्हे तर येथील वार्षिक उत्सव रोजगाराचे मोठे स्रोत बनले आहेत.