आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Where Are You Missing The Question Of The Supreme Court; Parambir Singh Says 'If I Am Allowed To Breathe, I Will Come Out Of The Pit'

परमबीर सिंहांना दिलासा नाहीच:तुम्ही कुठे गायब आहात? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; परमबीर सिंह म्हणतात - 'श्वास घेण्यास परवानगी मिळाली तर, मी खड्ड्यातून बाहेर येईल'

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंभर कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना अखेर फरार घोषित केले आहे. परमबीर यांनी आपल्या अटकेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, आधी कोर्टाला तुमचा ठावठिकाणा सांगा, तुम्ही सध्या कुठे आहात? असे कोर्टाने म्हटले आहे. त्यावर परमबीर यांच्या वकिलाने सांगितले की, 'मला श्वास घेऊ दिला तर मी खड्ड्यातून बाहेर येईल.' असे परमबीर सिंह यांच्यावतीने न्यायालयात वकिलाने सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार असून, परमबीर सिंह कुठे लपून बसले आहे. हे पुढील सुनावणीत स्पष्ट करावे. असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

मुंबई न्यायालयाने फरार घोषित केले
परमबीर सिंह यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने फरार घोषित केले आहे. गुन्हे शाखेच्या अर्जाला कोर्टाने मंजुरी दिली असून, 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे अल्टीमेटम त्यांना देण्यात आले असून संपत्तीही जप्त करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात सिंह यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंह यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे.

पोलिसांचे पथक अनेकवेळा चंदीगडला
याआधी गृह विभागाने परमबीर सिंह बेपत्ता झाल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोलाही दिली होती. विशेष म्हणजे परमबीर हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेल्यानंतर मे महिन्यापासून ते बेपत्ता आहेत. गृहविभागाने सिंह यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्रे पाठवली आणि त्यांचा ठावठिकाणा विचारला होता, परंतू कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या कुटूंबियांना देखील परमबीर कुठे गेले हे माहिती नाही.

ठाणे पोलिसांकडून लुकआऊट नोटीस

मुंबईच्या ठाणे पोलिसांनी गेल्या जुलै महिन्यात परमबीर सिंहांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर ते वारंवार हजर राहण्यात अपयशी ठरले आहेत. त्यानंतर त्याच्यावर आधी 5, नंतर 25 आणि नंतर 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. असे असतानाही परमबीर हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...