आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mansoon Update | Where Is More, Where Is Very Less Rain, 17% More Rain In July, Breaking 17 Years Record

मान्सून अपडेट:देशात कुठे जास्त, कुठे खूप कमी पाऊस, जुलैत 17% जास्त पाऊस, 17 वर्षांचा विक्रम मोडीत

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनची जोरदार बॅटिंग सुरू आहे. देशात जुलै महिन्यातील पाऊस सरासरीपेक्षा १७% जास्त झाला आहे. हा १७ वर्षांचा विक्रम आहे. याआधी जुलै २००५ मध्ये १८% जास्त पाऊस झाला. मात्र, या वर्षीचा मोसमी पाऊस कुठे जास्त तर कुठे खूप कमी झाला आहे. उदाहरणार्थ, देशाच्या पूर्व आणि ईशान्य राज्यांत जुलैमध्ये ४४.७% कमी पाऊस झाला. हा १२२ वर्षांतील सर्वात कमी आकडा आहे. हवामान विभागानुसार, येत्या २ महिन्यांत ईशान्येत पावसाची तूट भरून निघेल. जुलैमधील कमी पावसाचा सर्वात वाईट परिणाम प.बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात दिसला.

जुलै महिन्यातील पावसाचा अहवाल

सरासरी वास्तव फरक देशभर 280.4 327.7 +17% उत्तर-पश्चिम 209.7 232.3 +10.8% पूर्व-ईशान्य 424.1 234.6 -44.7% मध्य भारत 321.4 458.7 +42.7% दक्षिण भारत 204.5 328.1 +60.4%

गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये १९९४ नंतर एवढा जास्त पाऊस बरसला
-तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ६०.४% जास्त पाऊस झाला. याआधी १९६१ मध्ये ६८.२% जास्त पाऊस झाला होता. आयएमडीचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्र म्हणाले, जुलैच्या ४ कमी दाबाची सिस्टिम विकसित झाली. त्याचा परिणाम २१ दिवस सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत राहिला.
-गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये जुलैमध्ये १९९४ नंतर ४२% जास्त सरासरी पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...