आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:पंतप्रधान नरेंद्रर मोदी बनले जगातील एकमेव नेता, ज्यांच्यासाठी अमेरिकेतील व्हाइट हाउसने उचलले हे पाऊल

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताने अमेरिकेसह अनेक देशांना हायड्रोक्लोरोक्वीचा साठी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे

सध्या अमेरिकेसोबत असलेले भारताचे संबंध मजबूत झाले आहेत. अमेरिकेतील व्‍हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो केले आहे. हे यासाठी महत्वाचे आहे की, कारण व्हाइट हाउस जगातील कोणत्याच नेत्याला फॉलो करत नाही.

आतापर्यंत व्‍हाइट हाउस एकूण 19 ट्विटर अकाउंट्सला फॉलो करत होते. यात 16 अमेरिकेतील आणि तीन भारतातील आहे. भारतातील ज्या ट्विटर हँडलला व्हाइट हाउस फॉलो करत आहे, त्यात पीएम मोदीशिवाय पीएमओ इंडिया आणि भारताच्या राष्ट्रपतींचे ट्विटर हँडल सामील आहे. भारत सरकारने कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करणार आहे. भारताने या औषधांसह अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यातबंदी हटवून भारताने अमेरिकेला औषध पुरवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या जागतिक महामारीशी सामना करण्यासाठी भारत आपल्या मित्र देशांना सर्वतोपरी मदत करेल.

बातम्या आणखी आहेत...