आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:कोट्यवधी मोबाइलमध्ये डाऊनलोड झालेले आरोग्य सेतू अॅप कुणी तयार केले? केंद्राकडे याची माहितीच नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हे अॅप एनआयसी आणि आयटी मंत्रालयाने डेव्हलप केले होते. पण...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कोट्यवधी मोबाइलमध्ये डाऊनलोड झालेले आरोग्य सेतू हे अॅप नेमके कुणी बनवले, ही माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या काँटॅक्ट ट्रेसिंग अॅपबद्दल माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या उत्तराला समाधानकारक उत्तर दिले गेलेले नसल्याने माहिती आयोगाने नॅशनल इन्फरमेटिक सेंटरला (एनआयसी) जाब विचारला आहे.

या अॅपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप एनआयसी आणि आयटी मंत्रालयाने डेव्हलप केले होते. परंतु, याच संदर्भात आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना मात्र अॅपच्या डेव्हलपमेंटबद्दल माहिती नसल्याचे उत्तर एनआयसीने दिले आहे. त्यानंतर केंद्रीय माहिती आयाेगाने एनआयसीला कारणे दाखवा नोटीस बजावली.

दरम्यान, या नोटिसीनंतर हे अॅप अत्यंत पारदर्शी पद्धतीने तयार करण्यात आले असल्याचा खुलासा केंद्राने केला. सरकार म्हणाले, ‘हे अॅप पीपीपीअंतर्गत विकसित झाले आहे. त्याच्या निर्मितीबाबत कोणताही संभ्रम नाही. अाराेग्य सेतू अॅपला एनअायसीने उद्याेग व तज्ज्ञ स्वयंसेेवकांच्या सहकार्याने विकसित केल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.’