आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही आणि भविष्यात व्हायरसच्या स्वरूपात काय बदल होईल यावर शास्त्रज्ञांची वेगवेगळी मते आहेत. यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की, देशात ज्यांना लस घेतल्यानंतर संक्रमण (ब्रेक थ्रू इंफेक्शन)झाले आहे , त्यांच्या आरोग्यावर पूर्णपणे नजर ठेवली जावी. जेणेकरून योग्य परिस्थिती समजून घेता येईल आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवता येईल. केंद्र सरकार लस ट्रॅकर नावाचे व्यासपीठ तयार करेल.
या ट्रॅकरमध्ये, केवळ व्हॅक्सीन घेणाऱ्यांचीच पूर्ण माहिनी नसेल तर यासोबतच कोरोना संक्रमणाची चाचणी करणाऱ्यांचीही माहिती उपलब्ध असेल. ज्यांनी आतापर्यंत लसीकरण केले आहे त्यांची माहिती देखील या ट्रॅकरमध्ये उपलब्ध केली जाईल. आतापर्यंत, देशातील 54 कोटींपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर लसीचे दोन्ही डोस 16 कोटींपेक्षा जास्त लोकांना दिले गेले आहेत. याशिवाय 53 कोटीहून अधिक लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
आता पूर्ण डेटा एका ठिकाणी असेल
लसीकरण : लोकांच्या लसीकरणाची पूर्ण माहिती कोविन पोर्टलवर असते.
कोरोना चाचणी : आरटी-पीसीआर तपासाणीचा संपूर्ण डेटा ICMR च्या पोर्टलवर जमा होतो. टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांचा पूर्ण तपशील असतो.
हॉस्पिटलायझेशन: जेव्हा एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा उल्लेख एनसीडीसीच्या कोविड -19 इंडिया पोर्टलवर केला जातो. रूग्णांची माहिती रुग्णालये आणि IDSP कडून येते.
(या तीन पोर्टलला मर्ज करुन एक पोर्टल बनेल)
नवीन पोर्टलवर डेटाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अनेक फिल्टर बसवले जातील
आयसीएमआर समितीचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र अरोरा म्हणाले की, तिन्ही पोर्टल्सचे विलीनीकरण करून जे नवीन पोर्टल तयार केले जाईल, त्याचा उद्देश लसीकरणानंतर संसर्गाविषयी माहिती गोळा करणे हा असेल. लसीकरणानंतर, जर कोणी आरटी-पीसीआर चाचणी केली तर त्याची माहिती लगेच पोर्टलवर येईल. मग जर त्या व्यक्तीला रुग्णालयात जावे लागले तर त्याच्या उपचाराची सर्व माहितीही पोर्टलवर येईल.
एकाच व्यक्तीच्या डेटाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी तिन्ही पोर्टल्सचा डेटा मोबाईल नंबर, आयडी प्रूफ नंबर आणि वडिलांचे नाव यासारख्या अनेक फिल्टरद्वारे तपासला जाईल. म्हणजेच, लसीकरण आणि त्यानंतरच्या आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोणीतरी मोबाईल नंबर आणि आयडी पुरावा वेगवेगळा वापरला असला तरीही, वडिलांच्या नावावरुन तो ओळखला जाईल.
कोरोना चाचणीवर QR कोडसह प्रमाणपत्र देण्याची तयारी
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना चाचणीचे क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देण्याची तयारी सुरू आहे. दुबई सरकारची विनंती होती की कोरोना चाचणी प्रमाणपत्र असे असले पाहिजे की त्याची सत्यता राष्ट्रीय स्तरावर तपासली जाऊ शकते. NHA च्या CEO ने सुचवले की प्रमाण पत्रावर पासपोर्ट संख्या दिली जावी. आयसीएमआरचे महासंचालकही यावर सहमत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.