आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Who Is Responsible For The Spread Of Coronavirus ; Cardiothoracic Surgeon ON COVID Death; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाच्या भीतीने वाढला कोरोना:तज्ञ म्हणाले, संधी मिळल्यावरही लस न घेणारे या परिस्थितीसाठी जबाबदार

9 दिवसांपूर्वीलेखक: हिमांशु मिश्रा
  • कॉपी लिंक
  • जर लस घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती - डॉ. प्रसन्नसिम्हा

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडादेखील कमी होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, भारत देशात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे. सरकारी आकड्यानुसार देशात दररोज 3 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. परंतु, स्मशान घाट आणि स्मशानभूमीतून येणार्‍या संख्येमध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील तज्ञ आता उघडपणे बोलत असून आपली भूमिका मांडत आहे.

दरम्यान, बंगळुरू येथील श्री जयवेद इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स अँड रिसर्चचे प्राध्यापक डॉ. प्रसन्नसिम्हा हे सांगतात की, देशातील सध्याच्या परिस्थितीला ज्यांना संधी असूनही लस घेतली नाही असे लोक जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या लोकांनी इतर रुग्णांच्या चांगल्या उपचारांचा हक्कदेखील काढून घेतले आहे. डॉ. प्रसन्नसिम्हा यांच्या मते, देशातील सध्याच्या मृत्यूला आणि वाढत्या प्रादुभार्वाला लसी न घेणार लोकच कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.

जर लस घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती - डॉ. प्रसन्नसिम्हा
डॉ. प्रसन्नसिम्हा म्हणाले की, लसीकरणाबाबत लोकांच्या मनात जी शंका होती, तीच सर्वात मोठे हत्यार म्हणून समोर आली आहे. दरम्यान, ज्या लोकांना संधी असूनही लस घेतली नाही. तीच लोक मरत असल्याचा दावादेखील डॉ. प्रसन्नसिम्हा यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, जर या लोकांनी लस घेतली असती तर आज लोक उपचारासाठी वणवण भटकत राहण्याची वेळ आली नसती. त्यांना ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा तुटवडा जाणवला नसता.

लोक लसीकरणाला घाबरतात परंतु, मृत्यूला नव्हे
डॉ. प्रसन्नसिम्हा यांच्या मते, आपल्या देशात एक विचित्र विचित्र गोष्ट आहे. ती म्हणजे भारतातील लोकांना जीवनरक्षक लशीची भीती वाटते, परंतु कोरोनाच्या मृत्यूची नाही. ते पुढे म्हणाले की, लोकांची अशी मानसिकता आहे की, लस घेतल्यामुळे रक्त गोठते आणि तेच मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. परंतु त्या लोकांना हे ठाऊक नाही की, कोरोनाच्या 6 आठवड्यांनंतर शरीरात जमा होणार्‍या रक्ताच्यामुळे मृत्यूचा धोका अधिक जास्त असतो.

वृद्धांना त्वरित आयसोलेट करा

जर घरातील वृद्ध लोकांचे लसीकरण झाले नसेल तर त्यांना लवकरात लवकर आयसोलेट करत शक्य तितक्या लवकर त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करा. त्यासोबतच घरातेदखील मास्कचा वापर करा. डॉ. प्रसन्नसिम्हा यांनी सांगितले की, लोकांना प्लाझ्मासाठीसुद्धा फार त्रास घेण्याची आवश्यकता नाही. कारण सध्यातरी प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे निकर्ष कोणताही अहवालातून समोर आले नाही

बातम्या आणखी आहेत...