आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमधील 19 वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येपासून अंत्यसंस्कारापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्येचा आरोप माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्यवर आहे. तो अंकिताच्या हत्येनंतर 4 दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
अंकिताचा फोटो व्हायरल झाल्यानंतर जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतर पुलकितच्या कुटुंबीयाने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर अंकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला आमदार रेणू बिष्ट अत्यंत सक्रिय दिसून आल्या. त्यांच्याही अनेक ठिकाणच्या उपस्थितीवर सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, रिसॉर्टमध्ये काम करणार्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य व अंकित गुप्तावर मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. ही कर्मचारी म्हणाली - 'मी वनंतरा रिसॉर्ट मे महिन्यात जॉइन केले. पण जुलैमध्येच सोडले. पुलकित आर्य व अंकित गुप्ता मुलींशी गैरवर्तन करत होते. त्यांना अपशब्द म्हणत होते. ते रिसॉर्टमध्ये मुली घेऊन येत होते. तिथे व्हिआयपीही येत होते.'
अंकिता हत्याकांडाचा तपास आता एसआयटी करत आहेत. पण गुन्हा दाखल करण्यापासून तपासापर्यंत झालेला विलंब व बेजबाबदारपणातील अनेक मुद्यांचे उत्तर पोलिस किंवा प्रशासनाकडे नाही. आरोप आहे की, पुलकित अंकिताला वेश्या व्यवसायात लोटण्याचा प्रयत्न करत होता. अंकिताने त्याला विरोध केला असता तिला ठार मारण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित 5 प्रश्नांचे उत्तर पोलिस देत नाहीत. यामुळेही हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे...
प्रश्न -1: आरोपीने ज्या व्हिआयपीला खूश करण्यास सांगितले, तपासात त्याचे नाव का नाही?
अंकिताने आपल्या मित्राला व्हॉट्सएप चॅटवर सांगितले होते की, एक व्हिआयपी गेस्ट येत आहेत. रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य त्या गेस्टला स्पेशल सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकत आहे. यासाठी त्यांनी 10 हजार देऊ केले. पण अंकिताने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर पुलकित व अंकितात भांडण झाले. त्यानंतर तिला ठार करून कालव्यात फेकण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत तो व्हिआयपी गेस्ट कोण याचा तपास केला नाही. अंकिताच्या मित्राने हा गेस्ट नेहमीच रिसॉर्टवर येत असल्याचे सांगितले.
प्रश्न -2: VIP ची खोली सर्वप्रथम पेटवली, पेटवणारा अज्ञात?
जनता रिसॉर्टच्या बाहेर आंदोलन करत असताना भाजप आमदार रेणू बिष्ट तिथेच उपस्थित होत्या. तेव्हा रिसॉर्टला आग लागल्याचे वृत्त आहे. सर्वप्रथम आग व्हिआयपीसाठी बूक करण्यात आलेल्या खोलीला लागली. आग कुणी लावली हे कुणालाही माहिती नाही. तो तिथे थांबला की नाही याचेही ठोस पुरावे नाहीत.
या प्रकरणी महत्वाची गोष्ट ही आहे की, न्यायवैद्यक पथक खोलीच्या तपासासाठी 26 सप्टेंबर रोजी पोहोचले. पण ही खोली शनिवारीच भस्मसात करण्यात आली होती. दुसरीकडे, पौडीचे एसएसपी शेखर सुयाल यांनी आपल्या अधिकाऱ्यांनी 22 सप्टेंबर रोजीच रिसॉर्टची व्हिडिओग्राफी केल्याचा दावा केला आहे.
प्रश्न -3: मृतदेह 5 दिवस पाण्यात राहूनही का फुगला नाही?
पोलिसांच्या माहितीनुसार, अंकिताची हत्या 19 सप्टेंबर रोजी झाली. तिचा मृतदेह 24 सप्टेंबर रोजी आढळला. तो ही त्याच ठिकाणी, जिथे तिला फेकण्यात आले. त्यामुळे वाहत्या कालव्यात 5 दिवस मृतदेह एकाच ठिकाणी कसा राहिला, तो कुणाच्या नजरेस का पडला नाही, मृतदेह फुगला का नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
शवविच्छेदन अहवालानुसार, अंकिताच्या शरीरावर जखमांच्या खुना होत्या. 1 दातही तुटला होता. त्यानंतरही 5 दिवसांपर्यंत मासळ्यांनी मृतदेहाचे नुकसान का केले नाही. म्हणजे हत्येची वेळही संशयास्पद आहे.
प्रश्न -4: ज्या शवगृहात मृतदेह होता, तिथे कुटुंबाहून अगोदर आमदार का पोहोचल्या?
भाजप आमदार रेणू बिष्ट मॉर्च्युरीमध्ये पीडित कुटुंबापूर्वीच पोहोचल्या होत्या. मृतदेह 24 सप्टेंबर रोजी आढळला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर अंकिताचे वडील व भाऊ घटनास्थळी पोहोचले. त्यांना मृतदेह पाहू देण्यात आला नाही. मृतदेह ऋषिकेश एम्स स्थित रुग्णालयात ठेवण्यात आला. काही वेळाने कुटुंब मॉर्च्युरीत पोहोचले तेव्हा रेणू बिष्ट तिथे उपस्थित होत्या. त्यानंतर लोकांनी त्याचा विरोध केला. त्याच्या कारच्या काचा फोडल्या. तेव्हा त्यांनी तेथून काढता घेतला.
प्रश्न -5: बुलडोझर चालवण्यावर मौन का, प्रश्न उपस्थित झाल्यानंतर डीसी म्हणाले - आम्ही आदेश दिल नाही?
शुक्रवारी रात्री रिसॉर्टवर बुलडोझर चालवण्यात आले. काही भींती पाडण्यात आल्या. पण बिल्डींगचे स्ट्रक्चर सुरक्षित ठेवण्यात आले. ही घटना घडली, तेव्हाही भघाजप आमदार रेणू बिष्ट तिथे उपस्थित होत्या. घटनेनंतर 24 तासानंतर अंकिताच्या कुटुंबाने पुरावे मिटवण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर डीसी व एसडीएम यांनी आपण या पाडापाडीचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. आता हे कुणी केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजी मंत्र्याच्या मुलाने दारुच्या नशेत अंकिताला कालव्यात ढकलले
अंकिता भंडारी 18 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी रिसॉर्टला जाऊन कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मुलीचा पत्ता लागत नसल्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. अंकिता 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास पुलकित आर्य, त्याच्या रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर व अंकित उर्फ पुलकित गुप्ता यांच्यासोबत ऋषिकेशला गेली होती.
त्यानंतर तिन्ही आरोपींनी चीला रोडवर मद्यप्राशन केले. त्यावेळी अंकिताने रिसॉर्टमधील अवैध कृत्यांना विरोध दर्शवला. तसेच या कृत्यांचा भांडाफोड करण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तिला मारहाण केली व कालव्यात फेकून दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.