आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट चिंताजनक:भारतात पसरत असलेल्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले, पण म्हटले - व्हॅक्सीन याविरोधात प्रभावी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॅक्सीन आणि तपास फायदेशीर, उपचारमध्ये बदल नाही

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात पसरत असलेल्या स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सर्वात पहिले ऑक्टोबरमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट B.1.617 जास्त संक्रामक आहे आणि हा सहज पसरू शकतो.

कोरोनावर WHO च्या प्रमुख मारिया वॅन केरखोवनुसार एका छोट्या सँपल साइजवर केलेल्या लॅब स्टडीमध्ये समोर आले की, या व्हेरिएंट (B.1.617) वर अँटीबॉडीजचा कमी परिणाम होत आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, या व्हेरिएंटमध्ये व्हॅक्सीनप्रती जास्त प्रतिरोधक क्षमता आहे.

केरखोवने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, उपलब्ध डेटाने समजते की, कोरोनाच्या सर्व व्हॅक्सीन आजार रोखणे आणि B.1.617 व्हेरिएंटने संक्रमित लोकांचा जीव वाचवण्यात प्रभावी आहे. यासोबतच म्हटले की, या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मंगळवारी दिली जाईल.

व्हॅक्सीन आणि तपास फायदेशीर, उपचारमध्ये बदल नाही
WHO च्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनीही असे म्हटले आहे की सद्यस्थितीतील लस आणि तपासणी प्रभावी आहे. तसेच उपचारही पूर्वी सारखेच दिले जात आहेत. म्हणूनच लोकांना ते बदलण्याची गरज नाही, त्याऐवजी त्यांनी पुढे येऊन लसीकरण केले पाहिजे.

ब्रिटेन, ब्राझील आणि साउथ अफ्रीकेनंतर भारत चौथा देश आहे, जेथे पसरत असलेल्या कोरोना व्हेरिएंटला WHO ने कंसर्न कॅटेगिरीमध्ये सामिल केले आहे. केरखोव यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात जगभरात व्हेरिएंट ऑफ कंसर्न पाहायला मिळेल. यासाठी आपण संक्रमण रोखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे.

WHO ने आकड्यांवरही उपस्थित केले प्रश्न
WHO च्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी म्हटले की, भारतात संक्रमणाचा दर आणि मृत्यू चिंताजनक आहेत. स्वामीनाथन यांनी न्यूज एजेंसी ANI सोबत बोलताना म्हटले की, इंस्टीट्यूट फॉर मेट्रेक्स अँड इव्हॅल्यूशन (IHME) ऑगस्टपर्यंत 10 लाख मृत्यूंविषयी सध्याचे मॉडल आणि आकड्यांच्या आधारावरच सांगितले आहे, हा भविष्याचा आंदाज नाही. यामध्ये बदलही होऊ शकतो.

स्वामीनाथन यांनी म्हटले की, सध्या भारत आणि साउथ-ईस्टच्या दुसऱ्या देशांमध्ये कोरोनाचे रोज येणारे प्रकरण आणि मृत्यूविषयी चिंताजनक स्थिती आहे. डेटा देखील येथे कमी लेखलेला आहे. खरं तर, जगातील सर्व देशांमध्ये कोरोना संक्रमण आणि मृत्यूबद्दल कमी आकडे दाखवले आहेत. सरकारने वास्तविक आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...