आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी झालेल्या आपल्या साप्ताहिक बैठकीत ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट BA.2 बद्दल महत्त्वाची माहिती दिली. WHO च्या मते, BA.2 आतापर्यंत 57 देशांमध्ये पोहोचले आहे. त्याचा संसर्ग दर ओमायक्रॉनच्या इतर सब-व्हेरिएंटच्या तुलनेत खूप जास्त आहे. गेल्या महिन्यात या देशांमध्ये घेतलेल्या कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगनंतर, 93% पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनची पुष्टी झाली आहे.
ओमायक्रॉनच्या सर्व सँपलमध्ये BA.1 आणि BA.1.1 व्हेरिएंटची उपस्थिती 96% आहे. यामध्ये BA.1, BA.1.1, BA.2 आणि BA.3 या व्हेरिएंटचा देखील समावेश आहे. मात्र, BA.2 संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये, 50% पेक्षा जास्त लोकांना या प्रकाराची लागण होत आहे.
10 आठवड्यांत 90 कोटींपेक्षा अधिक लोक ओमायक्रॉनच्या विळख्यात
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस म्हणाले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 10 आठवड्यांत 9 कोटींपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. 2020 मधील जगातील एकूण संसर्गापेक्षा हे प्रकरण जास्त आहे. WHO प्रमुख म्हणाले- अनेक देश नागरिकांच्या दबावाखाली कोविड नियम शिथिल करत आहेत. आपण ओमायक्रॉनला हलके घेऊ नये. नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये मृतांची संख्या वाढली आहे.
ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड आणि नेदरलँडसह अनेक युरोपीय देशांनी लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. फिनलंड या महिन्यात कोरोना निर्बंध संपवणार आहे.
व्हेरिएंट पाहू नका, संसर्ग टाळा
WHO च्या टॉप एपिडिमियोलॉजिस्ट मारिया वॅन केरखोव यांनी सांगितले की, आपल्याकडे BA.2 सब व्हेरिएंटविषयी मर्यादित माहिती होती, परंतु प्राथमिक डेटाने ते BA.1 पेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की, प्रकार कोणताही असो, लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोना विषाणू पसरत आहे आणि विकसित होत आहे.
सब व्हेरिएंटला ओळखा
सब व्हेरिएंट हा एक प्रकारे व्हायरसच्या मूळ प्रकारातील कुटुंबाचा सदस्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ओमायक्रॉन (B.1.1.529) हा कोरोना विषाणूचा एक मूळ प्रकार आहे, ज्याचे तीन उप-प्रकार किंवा स्ट्रेन आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3. ओमायक्रॉन प्रमाणे, हे देखील लोकांमध्ये संसर्ग वेगाने पसरवण्याचे काम करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.