आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Man Who Went To Resolve A Dispute Set On Fire By Sprinkling Petrol, Latest News And Update

झारखंडमध्ये तरुणाला पेट्रोल टाकून पेटवले, VIDEO:दोन जणांचे भांडण सोडवण्यास गेला होता, गंभीर होरपळला; क्षेत्रात तणाव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडची राजधानी दुमका येथे एका अल्पवयीन तरुणीला जिवंत जाळल्यानंतर आता गढवामध्ये एका तरुणाला पेटवून दिल्याची घटना उजेडात आली आहे. हा युवक 2 जणांचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता. तेव्हा एका आरोपीने पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. त्यात हा तरुण गंभीर होरपळला आहे.

घटना गढवा जिल्ह्यातील वंशीधर नगर पोलिस ठाण्याच्या चितविश्राम गावातील आहे. येथील एका मुस्लिम तरुणाने दीपक सोनीवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित दीपक सोनी या घटनेत अत्यंत वाईट पद्धतीने होरपळला. तरुणाचे डोके व चेहरा जळाला आहे. त्याच्यावर स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणे प्रभारी योगेंद्र कुमार यांनी घटनास्थळावर जाऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली. घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण आहे.

रुग्णालयात दाखल दीपक सोनीने सांगितले -मी तर केवळ भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो. त्यांनी पेट्रोल टाकून माला जाळण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयात दाखल दीपक सोनीने सांगितले -मी तर केवळ भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो. त्यांनी पेट्रोल टाकून माला जाळण्याचा प्रयत्न केला.

2 जणांचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता

पीडित दीपक सोनी यांनी सांगितले की, त्याच्या घराजवळ अस्मुद्दीन अंसारी व अन्य एका व्यक्तीमध्ये भांडण सुरू होते. त्यानंतर मी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अंसारीने सोनीला शिवीगाळ करून धक्काबुद्दी केली. एवढेच नाही तर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात दीपक अत्यंत वाईट पद्धतीने होरपळला.

रुग्णालयात दीपकने सांगितले की, आरोपी पेट्रोलची विक्री करतो. मी त्याला तुम्ही भांडण का करत आहात, असे विचारले असता त्याने मला तुम्ही माझे मालक आहात का, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यानंतर बाटलीत पेट्रोल आणून त्याने माझ्यावर अंगावर टाकले व पेटवून दिले.

आरोपीचा शोध सुरू

घटनेनंतर पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी स्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. तूर्त या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार पोलिस आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी छापेमारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...