आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Who Will Be PM Modi's Successor । Survey Suggest Close Fight Between Amit Shah And Yogi Adityanath । People Also Preferred Gadkari

पंतप्रधान मोदींचे वारसदार कोण?:सर्वेक्षणात अमित शहा,  योगी आदित्यनाथांमध्ये चुरस; गडकरींनाही दिली लोकांनी पसंती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून लोक गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहत आहेत. यासंदर्भात इंडिया टुडे आणि सी-व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण आहे? या प्रश्नावर अमित शहा यांना 25 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 24 टक्के, नितीन गडकरी यांना 15 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. याशिवाय राजनाथ सिंह यांना 9 टक्के, निर्मला सीतारामन यांना 4 टक्के पसंती मिळाली आहेत.

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? यावर योगी आदित्यनाथ हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत, असा विश्वास 40 टक्के लोकांनी व्यक्त केला. तर अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर असून 22 टक्के लोकांनी त्यांना मतदान केले. याशिवाय ममता बॅनर्जी यांना 9 टक्के, एमके स्टॅलिन यांना 5 टक्के, वायएसआर आणि नवीन पटनायक यांना 4-4 टक्के मते मिळाली आहेत.

नितीन गडकरी हे मोदींचे सर्वात उत्तम मंत्री

मोदी सरकारच्या सर्वोत्तम मंत्र्याच्या प्रश्नावर 22.5% लोकांनी नितीन गडकरींना सर्वाधिक मतदान केले. दुसरीकडे, लोकप्रिय मंत्र्यांच्या यादीत राजनाथ सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 20.4% लोकांनी मतदान केले आहे. दुसरीकडे, अमित शहा 17.2% मतांसह तिसर्‍या आणि एस. जयशंकर 4.7% मतांसह चौथ्या आणि स्मृती इराणी 4.6% मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 44 टक्के लोकांचे मत होते. त्याचवेळी 17 टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयी, 13 टक्के इंदिरा गांधी आणि 8 टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांना सर्वोत्तम पंतप्रधान म्हटले, तर केवळ 5 टक्के लोकांनी जवाहरलाल नेहरूंना पसंती दर्शवली.

विरोधी पक्षांतील सर्वोत्कृष्ट नेते कोण?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढत आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्षांपैकी सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांना 27 टक्के लोकांनी मतदान केले आहे. त्याच वेळी, 20 टक्के लोकांची पसंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. सर्वेक्षणात या प्रश्नावर 13 टक्के लोकांनी राहुल गांधींना, 5 टक्के लोकांनी नवीन पटनाईक यांना आणि 4 टक्के लोकांनी शरद पवारांना पसंती दिली आहे.

काँग्रेसमधील सुधारणांसाठी राहुल गांधींवर विश्वास

काँग्रेसमध्ये कोण सुधारणा आणू शकते? असे सर्वेक्षणात विचारले असता, लोकांचा असा विश्वास होता की केवळ राहुल गांधीच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकतात. 22.8 टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली. यानंतर 15.7 टक्के लोकांनी मनमोहन सिंग, 13.7 टक्के लोक सचिन पायलट, 8.6 टक्के लोक प्रियंका गांधी, तर 5.7 टक्के लोकांना असे वाटते की, सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सुधारणा घडवून आणू शकतात.

बातम्या आणखी आहेत...