आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्य मराठी विश्लेषण बलदेव कृष्ण शर्मा
{डबल इंजिन सरकारची प्रथा का बदलू शकली नाही ? सत्ताविरोधी लोटसोबत भाजप अंतर्गत भांडणात बुडाली. लोक नाराज होते. त्यामुळे भाजने तिकीट बदण्याची चाल खेळली. राज्याऐवजी केंद्राची कामे सांगितली.पंतप्रधानांनी नेतृत्व सांभाळले. ८ सभा घेतल्या. मात्र, तिकीट वाटपात एक तृतीयांश दावेदार नाराज झाले. अनेकांनी पक्ष सोडला. जे सोबत आले तेही मनाने सोबत नव्हते. माजी सीएम धूमल आणि शांता गटांकडे दुर्लक्ष करणे महागात पडले. सीएम जयराम यांच्या नेतृत्वाला पक्षाने स्वीकारले नाही. पोटनिवडणुकीत जो आलेख घसरला तो घसरतच गेला. सीएम बदलण्याच्या शक्यताही विरल्या. काँग्रेसने वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभाना अध्यक्ष करून त्यांचा वारासा चालवला. मात्र, पक्षाचे केंद्र त्यांचे घर “हॉली लॉज’ला केले नाही. सीएमपदासाठी लढणारे संघटित राहिले.
{या मुद्द्यांमुळे भाजप हरली? कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. सचिवालयापर्यंत ती होती. २.७५ लाख कर्मचाऱ्यांपैकी सव्वा लाख पेन्शनर्स आहेत. हे एनपीएसमुळे नाराज आहेत. सफरचंद उत्पादकांचा खर्च वाढला. जीएसटी १२ वरून १८% केल्याने पॅकेजिंग खर्च वाढला. बागायतदारांनी आंदोलन केले. फलोत्पादनमंत्र्यांनी उत्पाकांविरुद्ध वक्तव्य केले. त्यामुळे भाजप अॅपल बेल्टमध्ये १७ पैकी १४ जागा हरली.
{काँग्रेस कशी बळकट झाली? स्थानिक मुद्द्यांवर भर राहिला.केंद्रीय नेतृत्वाला दूर ठेवले. केवळ प्रियंका गांधींच आल्या. निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल होऊ दिले नाही. आम आदमी पार्टीच्या पंजाब मॉडेलचे अनुकरण करत अशा आश्वासने दिली की,जे थेट लोकांशी जोडली होती. कर्मचाऱ्यांची नस पकडत जुनी पेन्शन प्रणाली पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत लागू करण्याचे आश्वासन दिले. महिलांना १५०० रु. महिना व ३०० युनिट मोफत वीज कामी आली.
{पंजाब विजयाने उत्साहित आपची स्थिती अशी का झाली? हिमाचल निवडणूक राज्य आणि रितीत बदलली. आपला अंदाज आला की, येथे तिसरा पक्ष उभा राहू शकत नाही. त्यांना मोठे चेहरेही मिळाले नाहीत. पंजाबमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घटना समोर आल्या. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर संगरूर पोटनिवडणुकीत हरल्याने हिमाचलमध्ये प्रतिमा बनू शकली नाही. काँग्रेसला पर्याय होत नसल्याने आपने पूर्ण भर गुजरातवर दिला.
{निकालांचा परिणाम काय? राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हिमाचलचे आहेत. तरीही जिंकून देऊ शकले नाहीत. हिमाचलच्या वातावरणाचा परिणाम हरियाणावर पडतो,तसेच राजकारणाचेही असते. हरियाणात २ वर्षांत निवडणूक आहे. हिमाचलमध्ये भाजप हरल्याने आघाडी सरकारवर दबाव वाढेल. कारण, सत्ताविरोधी लाटही येथे बनत आहे. हरियाणात काँग्रेस उत्साहित आहे. ते हरियाणात विश्वास शोधत आहेत. त्याचा परिणाम हरियाणातही होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.