आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Why Did You Send Your Soldiers Unarmed To Be Martyred? Rahul Gandhi Questions Modi Government

प्रतिक्रिया:आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवले का? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी यांचे शहीद जवानांचा उल्लेख करत ट्विट

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ल़डाख येथील गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या चकमकीवर प्रतिक्रिया दिली. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. याविषयी राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र का पाठवले? असा सवालही त्यांनी केला आहे. 

राहुल गांधी यांनी शहीद जवानांचा उल्लेख करत ट्विट केले की, आपल्या निशस्त्र सैनिकांची हत्या करण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवण्यात आले का?

तसेच बुधवारी काँग्रेस नेत्याने सवाल केला होता की, पंतप्रधान यावर शांत का? ते लपून का बसले आहेत? आता खूप झाले. काय झाले हे जाणून घेण्याची आपल्याला गरज आहे. ते म्हणाले होते की, आपल्या सैनिकांची हत्या करण्याची चिनची हिंमतच कशी झाली? आपल्या भूमीवर कब्जा करण्याची त्यांची हिंमत कशी झाली?

भारत-चीनच्या झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते 

गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. तर 40 चिनी सैनिकही मारले गेले आहेत. याच गलवान कोऱ्यात 1962 मधील चकीमकीत 33 भारतीयांनी जीव गमावला होता. 

0