आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालीताणा-गुजरातच्या देरासरमध्ये तोडफोड झाली. झारखंडच्या श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने काही दिवसांपासून जैन समाज नाराज आहे. शांततापूर्ण, मौन निदर्शने करून ही नाराजी व्यक्त केली जात आहे. तिखट, आक्रमक शब्दांचा प्रयोगही केला जातोय. त्या वेळी सहज प्रश्न उपस्थित होतो की नेहमी नम्र-शांत राहणारा हा समाज अचानक एवढा का संतापलाय? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्याशी साधलेला संवाद...
श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित करण्यास विरोध का ?
- तीर्थस्थळ पवित्र - पावन आहे. आमच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे. त्या पवित्रतेला धक्का लागू नये अशी आमची इच्छा आहे. इथे लाखो लाेकांनी यावे. त्याचे एक ठरावीक संविधान आहे. पर्यटनस्थळ झाल्यास इथे मद्यपान, मांसाहारही पोहोचेल. ते आम्हाला नकोय.
...पण काही पर्यटन व धार्मिक स्थळी मद्यपान-मांसाहाराला बंदी आहे. सरकारने अटींसह हालचाली केल्या तर?
- कदापि नाही. आम्हाला नकोय. असे शक्यच नाही. सरकार म्हटले तरी शक्य नाही. पर्यटनस्थळ झाल्यावर अशा प्रकरणांवर अंकुश ठेवणे अशक्य होईल. या मुद्द्यावरून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती नको आहेत. अनेक स्थळांवर अटी आहेत, पण त्यांचे पालन कोण करतो?
दिल्लीत चर्चा आहे की सरकार मागे हटण्यास तयार नाही. पुढे काय?
- आम्ही खूप पुढचा विचार केलेला नाही. कारण सरकार आमचे ऐकेल, असे आम्हाला वाटत आहे. आम्ही शक्य तितके प्रयत्न करू. पर्यटनस्थळ झाल्यास पंचतारांकित हॉटेल होतील, कसा अंकुश राहील? सरकारही काय करू शकेल? मग तिथे व्यभिचारही होईल आणि कॅब्रे डान्सही. प्रश्न हा आहे की, खरंच याची गरज आहे का? होय, जे लोक येऊ इच्छितात त्यांनी यावे, पण आमच्या व्यवस्थेत राहावे लागेल.
नेहमी शांतता-अहिंसेचा संदेश देणारा जैन समाज इतका संतापलेला का?
{माझ्या घराची तोडफोड केल्यास, घरात चोर शिरल्यास आणि बहीण-मुलींच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न झाला तरीही शांत राहायचे का? कुणी माझ्या घरात घुसला अन् समजावूनही तो जात नसेल तर हाती दंडुका घ्यावा लागतो. आक्रमण झाल्यावर प्रतिकारही करावा लागतो. याला गुन्हा म्हणता येत नाही.
अचानक असे काय झाले की, जैन तीर्थस्थळांवर अशा घटना वाढल्या?
- वाढल्या असे नाही. कधी-कधी घडल्या आहेत.
समजावून सांगण्याचे अनेक प्रयत्नही केले, पण आमच्या विनम्रतेला जर कुणी कमजोरी समजत असेल तर संघर्ष करावाच लागेल. मवाळ शब्दाचा अर्थ त्यांना कळाला नाही, म्हणून गरमी दाखवावी लागली.
युवा पिढीत बदल झाला पाहिजे, हे तुम्ही मानता?
{होय अवश्य बदल झाला पाहिजे. आयुष्यात मूलभूत पैलू तर असलेच पाहिजेत, असे मला युवा पिढीला सांगायचे आहे. मात्र, काही अशी मूल्ये असतात ज्यांच्याशी तडजोड होत नाही.
आजची पिढी एखादा हल्ला सहन करू शकत नाही का?
{वैयक्तिक हल्ला वेगळा मुद्दा आहे. हा आक्रोश समाजाचा आहे, वैयक्तिक नाही.
लाखांची नोकरी सोडून दीक्षा घेण्यासाठी येतात, याबबात तुमचे काय विचार आहेत?
{आई-वडिलांच्या मंजूरीनंतरच दीक्षा दिली जाते. परदेशात जाणाऱ्या तरुणांना थांबवा. मोठा होऊन तो परदेशात जातो. कधीच परत येत नाही. आल्यास आई-वडिलांची सेवा करतो का? याबाबत कुणी मोहीम राबवली, आंदोलन केले? इथे राहूनच आई-वडिलांची सेवा करा, असे त्यांना सांगा. ‘हम दो हमारे दो’ हे सूत्र आई-वडील मानत नाहीत. हे लज्जास्पद नाही का? अशा वेळी आई-वडिलांची आठवण होत नाही आणि दीक्षेच्या वेळी आठवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.