आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Why Sachin Pilot Angry With Gehlot? Everything You Need To Know About Rajasthan Politics

एक्सप्लेनर:गहलोत यांच्यावर का भडकले आहेत सचिन पायलट? कधी थांबेल हा अहंकाराचा संघर्ष? राजस्थानचे काँग्रेस सरकार तरणार की पडणार?

जयपूर3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील दीड वर्ष जुने कॉंग्रेस सरकार हे कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन करण्यापूर्वीच मार्चमध्येच उलटले होते. ज्योतिरादित्य सिंधिया हे कॉंग्रेसमधील बंडाचा चेहरा बनले. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवार ते सोमवार या काळात झालेल्या अनागोंदीनंतर हे स्पष्ट झाले की सध्या सरकारवर कोणतेही संकट नाही. पण विश्लेषकांचे मत आहे की अहंकाराचा संघर्ष लवकर शांत होणार नाही.

का नाराज आहेत सचिन पायलट?

 • राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना राज्सथान पोलिसच्या स्पेशल ऑपरेशंस ग्रुप (एसओजी)ने शुक्रवारी संध्याकाळी नोटीस पाठवली. राजस्थानमध्ये पोलिस विभाग थेट मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काम करते. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे सचिन पायलट नाराज झाले.
 • विशेष म्हणजे गहलोत यांच्याजवळही गृह विभाग आहे. शिवाय, त्यांच्यासह काही अन्य अपक्ष आमदारांना एसओजीची नोटीसही मिळाली आहे. खुद्द गहलोत यांनी ट्विट केले आहे की निवेदन नोंदविण्यासाठी नोटीस पावण्यात आली आहे. याप्रकरणात यापेक्षा जास्त काहीही नाही. 
 • मात्र, समन मिळताच पायलट आणि त्यांचे समर्थक भडकले. वास्तविक पाहता या प्रकरणात एसओजीने भाजपच्या दोन नेत्यांना अटक केली आहे. येथे त्यांच्या टॅप केलेल्या संभाषणात असे म्हटले गेले होते की, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भांडत आहेत'. शिवाय असेही म्हटले होते की 'उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे'.
 • भाजप आपले सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. यासाठी प्रत्येक आमदाराला 20-25 कोटी रुपयांची लालूच दाखवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, भाजपच्या केंद्र व राज्यातील नेत्यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ही संपूर्ण घटना काँग्रेसमधील दुफळीमुळे होत असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

पायलट बैठकीत का हजर नाही?

 • शुक्रवारी पायलट यांना नोटीस बजावल्यापासून राजस्थान सरकार अस्थिर झाले आहे. त्यानंतर अशोक गहलोत आपले सरकार वाचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनी रविवारी सर्वप्रथम आपल्या घरी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली आणि त्यानंतर सोमवारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविली.
 • मात्र पायलट व त्यांचे समर्थक आमदार सोमवारी सर्वपक्षीय आमदार किंवा कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. बदलत्या राजकीय घडामोडींबाबत शनिवारी कॉंग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही सक्रिय झाले. सोमवारी झालेल्या बैठकीत रणदीप सुरजेवाला, अजय माकन हे नेतेही उपस्थित होते.
 • वेगवेगळ्या वेळी केलेल्या दाव्यांनुसार, पायलट यांच्याकडे सध्या 10 ते 30 आमदार आहेत. पायलट समर्थकांनी असा दावा केला की 18 आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपासून स्वत: ला दूर केले. मात्र, या बैठकीला पक्षाच्या 107 आमदारांपैकी 102 आमदार उपस्थित होते, असे गहलोत यांचे माध्यम सल्लागार म्हणाले.
 • सचिन पायलट यांनी रविवारी सायंकाळी दावा केला होता की, काँग्रेसच्या 30 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. राज्याचे गहलोत सरकार अल्पमतात आहे. पायलट यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची नाराजीही स्पष्ट केली. तथापि, राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी आमच्याकडे 109 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे असल्याचा दावा केला आहे.

...तर आता सचिन पायटल भाजपमध्ये जाऊ शकतात का?

 • तसे दिसत नाही. पायलट यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अशी चर्चा झाली की ते नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. अशा प्रकारे राज्यात तिसऱ्या पक्षाची स्थापन होऊ शकते. 'प्रोग्रेसिव्ह कॉंग्रेस' च्या नावाने तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे.
 • मात्र, तीन वेळा सचिन पायलट यांना तोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपमध्ये आणणारे जफर इस्लाम हे पायलट यांच्या संपर्कात आहेत. ते सर्व राजकीय गणितांबाबत भाजपाच्या उच्च कमांडला अपडेट्स देत आहेत.
 • जफर इस्लाम यांचे पूर्ण नाव डॉ. सय्यद जफर इस्लाम आहे. ते भाजपाचे स्पष्ट बोलणारे आणि उदारवादी मुस्लिम चेहरा आहे. त्यांची भाजपामधील कारकीर्द अवघ्या 7 वर्षाची आहे, परंतु त्यांची प्रगती वेगाने झाली आहे. भाजपचे प्रवक्ता म्हणून जफर हे माध्यमांचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते ड्यूश बँकेचे एमडी होते आणि परदेशात होते.
 • सूत्रांनी सांगितल्यानुसार सिंधिया यांनी बंडखोरी केली आणि कॉंग्रेसपासून विभक्त झाले. त्यानंतर भाजपने पायलट यांच्याशीही संपर्क साधला होता. पायलट यांना भाजपने जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर पदाची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी पायलट यांनी नकार दिला होता.
 • यानंतर राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने पायलट यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हाही भाजप यशस्वी होऊ शकले नाही. पायलट हे योग्य संख्या गोळा करण्यात अक्षम होते. त्यावेळीसुद्धा कॉंग्रेसला आपल्या आमदारांना हॉटेलच्या बंदिवासात ठेवावे लागले होते. आता ही तिसरी वेळी जेव्हा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. 

गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटू शकेल का?

 • केंद्रीय नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहेत. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल तर आपण पक्षाध्यक्ष आणि हायकमांड यांच्याशी बोलू शकता. सचिन पायलट पक्षाचे प्रभारी अविनाश पांडे यांच्यासमोर आपला मुद्दा मांडू शकतात. पायलट जयपूरमध्ये येण्याची वेळ देखील सांगू शकतात. बैठकीत त्यांची प्रतिक्षा असेल.
 • राजस्थानमधील वाद लवकरात लवकर संपवावा अशी सोनिया गांधी, राहुल-प्रियांका यांच्यासह केंद्रीय नेतृत्त्वाची इच्छा आहे. मध्य प्रदेशातील परिस्थिती ओळखण्यात विलंब आणि निष्क्रियतेच्या परिणाला पक्षाला सामोरे जावे लागले आहे. आता काँग्रेसला राजस्थानमध्येही आपले सरकार पडू द्यायचे नाही.
 • सध्या गहलोत-पायलट यांच्यातील लढाई पूर्णपणे नोटीसवर केंद्रीत अल्याचे बोलले जात आहे. पण हे प्रकरण यापुरते मर्यादित नाही. पायलट हे सध्या राजस्थान कॉंग्रेसचे अध्यक्षही आहेत. हे पद सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाटत आहे की, त्यांच्याच कोणत्यातही जवळच्याला प्रदेशाध्यक्ष हे पद देण्यात यावे.
 • या दोघांमध्ये, वादाची ठिणगी ही 2018 च्या विधानसभा निवडणुकीतच पडली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट विजयी झाले, परंतु अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांचे नाव न घेता बर्‍याच वेळा निशाणा साधला आहे.
 • यापूर्वी गहलोत यांनी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरबदलामध्ये पायलट यांना महत्त्व दिले नाही. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की आयएएस आणि आयपीएस सोडाच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरही त्यांच्या पसंतीचा मिळाला नाही. राज्याच्या प्रशासकीय कॉरिडोरमध्ये अशी चर्चा आहे की पायलट यांचे त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत पटत नाही.
 • कोटा येथील सरकारी रुग्णालयात 107 मुलांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून पायलट यांनी स्वत: च्या सरकारला धारेवर धरले होते. इतकेच नव्हे तर गहलोत आणि त्यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या बैठकी लांबणीवर टाकल्या जात असल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा पुन्हा उपस्थित केला होता. ही समिती कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तयार केली होती.

...पुढे राजस्थान सरकारचे काय होणार?

 • सचिन पायलट यांचा असा दावा आहे की त्यांच्या संपर्कात 30 हून अधिक आमदार आहेत. जर हे सत्य असेल तर गहलोत सरकार अल्पमतात येईल. कॉंग्रेसच्या 107 पैकी 30 आमदारांनी राजीनामा दिल्यास सभागृहात आमदारांची संख्या 170 होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी 86 आमदारांची गरज भासणार आहे.
 • 30 आमदारांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसकडे 77 आमदार असतील. आरएलडीचे आमदार आधीच त्यांच्यासोबत आहेत. कॉंग्रेसची एकूण संख्या 78 असेल. बहुमतापेक्षा 8 कमी आहे. दुसरीकडे, भाजपाकडे 3 आरएलपी आमदारांसह 75 आमदार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला अपक्ष फोडावे लागतील. सध्या राज्यातील 13 अपक्ष आमदारांपैकी 10 कॉंग्रेस समर्थक आहेत. जर भाजपा 8 आमदारांना आपल्या बाजूने खेचू शकले तर ते सरकार बनवू शकता.
 • राजस्थान विधानसभेतील पक्षाची स्थिती पाहिल्यास कॉंग्रेसकडे 107 आमदार आहेत. सरकारला 13 पैकी 10 अपक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे गहलोत यांना 118 आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, भाजपाकडे 72 आमदार आहेत. बहुमत मिळवण्यासाठी किमान 29 आमदारांची आवश्यकता आहे.
 • पायलट यांच्या दाव्याखेरीज आतापर्यंत कॉंग्रेसचे 15 आमदार त्यांच्या गटात येण्याची शक्यता आहे. हे सर्व आमदार राजीनामा देत असतील तर सभागृहात आमदारांची संख्या 185 होईल. बहुमतासाठी लागणारा आकडा 93 पर्यंत पोहोचले. सध्याच्या समीकरणात गहलोत गटात कॉंग्रेसचे 92 आमदार आहेत. आरएलडीचा एक आमदार त्यांच्यासोबत आहे आणि काही अपक्ष गेहलोत यांच्याबरोबर असतील तर सरकार सुरक्षित राहील.

सोमवारी दिवसभर झालेल्या गदारोळाचा काय परिणाम झाला?

 • सोमवारी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आम्रपाली ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा आणि कॉंग्रेस नेते धर्मेंद्र राठोड यांच्यावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील या दोन नेत्यांच्या 24 ठिकाणी कारवाई करण्यात आली. हे दोन्ही नेते गहलोत यांचे अत्यंत निकटचे आहेत. ते निवडणूक व्यवस्थापन आणि पक्षाच्या निधीचे काम पाहतात.
 • जयपूरजवळील कुकसमधील हॉटेल फेअर माउंटवरही ईडीने छापा टाकला. हॉटेल अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत याच्या जवळच्या व्यक्तिचे आहे. बीज कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांच्या जयपूरमधील अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला. इन्कम टॅक्सची टीम राठोड यांच्या निवासस्थानी पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर चुकवल्याच्या तक्रारीवरून हे छापे मारण्यात आले आहेत.
 • राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात या छापेमारीच्या राजकारणाची सुरूवात झाली. कॉंग्रेसने म्हटले आहे की, भाजप चुकीच्या पद्धती अवलंबत आहे. रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला आहे की प्रत्येक वेळी भाजपा तपास यंत्रणेला  पाठवतात. सकाळपासूनच याप्रकारे छापे टाकून कॉंग्रेसच्या सहका-यांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.