आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Why The Hope Of The World From India ... We Are Taking Such A Pace In Spite Of Many Obstacles In The Development Journey ...

विकासयात्रा:भारताकडून जगाच्या आशा का...विकासयात्रेत अनेक अडथळे असूनही अशी गती घेत आहोत आपण...

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज भारताचा आर्थिक-सामाजिक विकास संपूर्ण जगाच्या नजरेत भरलेला आहे. मग तो सर्वात मोठ्या ग्राहक बाजारपेठेच्या रूपात असो की, सर्वात मोठ्या कार्यशक्तीच्या रूपात... प्रत्येक देशाचा विकास भारताच्या विकासाशी थेट जोडलेला आहे. भारताकडून जगाच्या अपेक्षा का आहेत, हे आकड्यांद्वारे पाहू.

भविष्य; ऑस्ट्रेलियाने मान्य केले-२० वर्षे गुंतवणुकीसाठी भारत सर्वात चांगला आहे

  • भारताने ४० कोटी लोकांच्या कौशल्य विकासासाठी कार्यक्रम सुरू केला. देशातील ५४% कामगारांना एक महिना ते वर्षभरापर्यंतचे अतिरिक्त प्रशिक्षण मिळेल.
  • जागतिक गुंतवणूकदारांत भारताबद्दल आकर्षण सतत वाढत आहे. भारतात ऑस्ट्रेलियाची निर्यात २०१७ च्या १४.९ अब्ज डॉलरवरून वाढून आता ४५ अब्ज डॉलर झाली आहे. ऑस्ट्रेलियन उद्योगपतींच्या संघटनेचे मानणे आहे की, २० वर्षांपर्यंत गुंतवणुकीसाठी भारतच सर्वात चांगला आहे.

बळ : काम करणाऱ्या लोकसंख्येत २०२५ पर्यंत जगातील प्रत्येक ५ वी व्यक्ती भारतीय

  • भारतात १५-५९ वर्षांच्या वर्किंग एज ग्रुपचा वाटा ६२% व सरासरी वय २७ वर्षे आहे. अमेरिकेचे ४०, युरोपचे ४६ आणि जपानचे ४७ आहे. २०२५ मध्ये वर्किंग लोकसंख्येत दर ५ वी व्यक्ती भारतीय असेल.
  • २०५० पर्यंत चीनमध्ये मुले आणि ज्येष्ठांची लोकसंख्या ७०% पर्यंत पोहोचेल, ती सध्या ३५% आहे. भारतात मुले आणि ज्येष्ठांची लोकसंख्या ५०% पेक्षा थोडी कमी असेल. सध्या ती ५० टक्क्यांच्या ज‌वळ आहे.

संपत्ती : २०५० पर्यंत महाशक्ती अमेरिकेला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे भारत

  • आजचा वेग सांगतो की, २०५० मध्ये अमेरिकेला मागे टाकून भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. तर २०२८ मध्ये अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो.
  • गेल्या २० वर्षांपासून विदेशी गुंतवणूक १९ टक्क्यांच्या वार्षिक गतीने वाढत आहे. १९९० मध्ये भारताच्या जीडीपीच्या तुलनेत एकूण व्यापार १३% होता, तो सध्या ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

प्राइस वॉटर कूपरच्या अहवालानुसार दरडोई उत्पन्नात आपण ७५ वर्षांत जो वृद्धी दर गाठला आहे... पुढील ३० वर्षांत तोही खूप वेगाने वाढेल. आजची सुमारे १३९ कोटी लोकसंख्या २०५० पर्यंत वाढून १६४ कोटी झाल्यानंतरही दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा वाटा मोठ्या प्रमाणात घटेल.

बातम्या आणखी आहेत...