आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Wife, Along With Her Brother, Dragged Her Husband For About Half A Km By Tying Him Behind The Tempo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:दारू पिऊन मारणाऱ्या पतीला पत्नीने शिकवली अद्दल, टेम्पोला बांधून अर्धा किलोमीटर ओढत नेले

सूरत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीने आपल्या भावासोबत मिळून दारुड्या पतीला अद्दल घडवण्यासाठी टेम्पोला बांधून अर्धा किलोमीटर फरफटत नेले
  • 'पती दारू पिऊन मारायचा'

गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील कडोदरा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुक्रवारी एका पत्नीने आपल्या भावासोबत मिळून दारुड्या पतीला अद्दल घडवण्यासाठी टेम्पोला बांधून अर्धा किलोमीटर फरफटत नेले. दरम्यान, टेम्पो थांबवल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही आरोपींना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधिन केले. यातील जखमी पतीला सूरतच्या स्मीमेर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

पती दारू पिऊन मारायचा

शीतल यांनी पोलिसांना सांगितले की, पती बालकृष्ण एका मिलमध्ये काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. तो रोज दारू पिऊन शीलत यांना मारहाण करतो. यामुळे पतीला अद्दल घडवण्यासाठी असे केले. शीतलने आपला भाऊ टेम्पो चालक अनिलला घरी बोलवले आणि टेम्पोला बांधून फरफटत नेले.

आरोपी अनिल
आरोपी अनिल
बातम्या आणखी आहेत...