आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Wife Beaten, Madhya Pradesh ADG Purushottam Sharma Suspended; The Video Was Sent To The Seniors By His Son

भोपाळ:पत्नीला मारहाण, मध्य प्रदेशचे एडीजी पुरुषोत्तम शर्मा निलंबित; मुलानेच वरिष्ठांकडे पाठवला होता व्हिडिओ

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

पत्नीला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात आल्यानंतर मध्य प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) पुरुषोत्तम शर्मांना निलंबित करण्यात आले.

शर्मांच्या पत्नीने त्यांना एका मैत्रिणीसोबत रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला मारहाण केली, असे म्हटले जात आहे. पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही किंवा यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विभागात उपायुक्तपदी असलेले शर्मा यांचे चिरंजीव पार्थ यांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना पाठवून आपल्या वडिलांची तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले, असे म्हटले जात आहे.

असे आहे प्रकरण

शर्मांशी संबंधित दोन व्हिडिओपैकी एकात असे दिसते की, शर्मा रविवारी मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेले होते. पत्नी प्रियाने मागोमाग जाऊन पतीला रंगेहाथ पकडले. पत्नी तिथे पोहोचताच शर्मा तेथून निघून गेले. दुसऱ्या व्हिडिओत ते घरात पत्नीला मारहाण करत असल्याचे दिसते.