आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊन काळात काही कार्यालये बंद होती. काही संस्थांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली होती. याचा सदुपयोग काही कर्मचाऱ्यांनी कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठीही केला, तर काही कर्मचाऱ्यांना याचा त्रासही झाला. आश्चर्याची बाब म्हणजे पत्नींकडून छळ झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. पुरुषांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या देशातील संस्थांनी सांगितले, लॉकडाऊन काळात देशभरात पत्नींकडून पतींचा छळ होण्याच्या घटना २७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात दिल्ली पहिल्या स्थानी आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीत सर्वाधिक १००८९ प्रकरणे असून महाराष्ट्रात ९८०९ प्रकरणे घडली.
देशभरातून पुरुषांसाठींच्या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीत पतींनी सांगितले, भांडी फेकून मारणे, झाडूने मारहाण, केस ओढणे आणि नखाने ओरबाडणे, चावणे यासारख्या हिंसक घटना पत्नींनी केल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारी करणाऱ्यात २५ ते ४५ वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या जास्त आहे. इंदूरची पौरुष संस्था, राष्ट्रीय पुरुष आयोग समन्वय समितीच्या सदस्यांनी सांगितले, पत्नी व सुनांच्या हिताचे कायदे तयार केले गेले. पुरुषाने छळ झाल्याची तक्रार केली तर पोलिस गुन्हा नोंदवून घेत नाहीत. लॉकडाऊन काळात पुरुषांचा विविध प्रकारे छळ झाल्याच्या तक्रारी आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.