आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक अजब किस्सा समोर आला आहे. सोमवारी विशाखापट्टणममधील आरके बीचवर एक जोडपे त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पत्नी बेपत्ता झाली. ती समुद्रात बुडाली असे नवऱ्याला वाटले. तो तिचा मृतदेह शोधत राहिला. नंतर ती आंध्रातील नेल्लोरमध्ये तिच्या प्रियकरासोबत असल्याचे उघड झाले.
अचानकपणे ती बेपत्ता झाल्यानंतर पतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन दिवस समुद्रकिनारी आणि आसपासच्या परिसरात महिलेच्या मृतदेहाचा शोध घेतला. त्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. सोबतच सागरी पोलिस, गोताखोर, मच्छीमारांनी शोध घेतला. शोधमोहिमेसाठी प्रशासनाकडून सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले.
जोडपे लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते
21 वर्षीय साईप्रिया ही विशाखापट्टणमची रहिवासी आहे. तिने दोन वर्षांपूर्वी श्रीकाकुलम येथील रहिवासी श्रीनिवास राव यांच्याशी विवाह केला होता. सोमवारी, पती-पत्नी सिंहचलम मंदिरात त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आणि नंतर समुद्रकिनार्यावर फिरायला गेले.
सोमवारी रात्री हे जोडपे समुद्रकिनारी फिरायला गेले होते. यादरम्यान पतीला फोन आला आणि तो पत्नीला सोडून थोडा लांब गेला, त्याची पत्नी तिच्या फोनवर सेल्फी घेत होती. काही मिनिटांनी तो परत आला असता पत्नी सापडली नाही. पत्नी समुद्रात वाहून गेल्याचे त्यांना वाटले, त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली.
महिलेने नेल्लोरहून पालकांना पाठवला संदेश
महिला आरके बीचवरून तिच्या प्रियकरासह पळून गेली आणि ट्रेनने नेल्लोरमधील कावली येथे पोहोचली. पळून जाण्यापूर्वी तिने तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते आणि तिचा फोनही सोबत नेला नव्हता. नेल्लोरला पोहोचल्यानंतर तिने नवीन सिम विकत घेतले आणि ती सुरक्षित असून तिचा प्रियकर रवीसोबत असल्याचा संदेश तिच्या पालकांना पाठवला.
तिने तिच्या पालकांना व्हॉट्सअॅपवर एक व्हॉईस मेसेज पाठवला की, रवीशी तिचे लग्न झाले आहे, त्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नका. शोधण्यात त्रास झाल्याबद्दल तीने सरकारी अधिकाऱ्यांची माफीही मागितली. तिने तिच्या पालकांना सांगितले की, जर त्यांनी तिचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला तर ती आत्महत्या करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.