आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Wife Is Six Months Pregnant, Husband Drive Scooty From Godda To Gwalior For Examination Of Wife, So That She Can Become A Teacher

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची पॉझिटिव्ह बातमी:पत्नी शिक्षक व्हावी म्हणून परीक्षेसाठी 1200 किमी स्कूटीवर बसवून नेले, पैसे नसल्याने दागिने ठेवावे लागले गहाण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवास करताना पत्नी 6 महिन्यांची गर्भवती होती

26 वर्षीय धनंजय कुमार आपल्या सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीला परीक्षा देण्यासाठी झारखंडमधील गोड्डा येथून ग्वाल्हेर येथे आला आहे. या दोघांनीही 1200 किमीचा हा प्रवास स्कूटीने तीन दिवसात पूर्ण केला. धनंजयची पत्नी सोनी हेम्ब्रम 24 वर्षांची आहे. तिला शिक्षिका व्हायचं आहे. सोनी ग्वाल्हेरमध्ये डिलेड (डिप्लेमा इन एलिमेंट्री एज्यूकेशन) द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहे. नवरा दहावी पासही नाही.

आज जाणून घेऊया या कहानीचे नायक धनंजय कुमारांच्या शब्दात त्यांचा अनुभव...

'मी एक कूक आहे. गुजरातमध्ये दिर्घकाळापासून कॅन्टीनमध्ये जेवण बनवत होतो. गेल्यावर्षी 2 डिसेंबरला माझे लग्न सोनीसोबत झाले. ती माझ्यासोबतच राहत होती. लॉकडाऊन लागले तेव्हा आम्ही आमच्या घरी गोड्डा येथे येण्याचा प्रयत्न केला. यासाठी झारखंड सरकारच्या अॅपमध्ये फॉर्म भरता. तेथून फक्त फोन आला, पण मदत काही मिळाली नाही.'

"दरम्यान, आमच्या कॅन्टीनच्या मालकाने आम्हाला दोघांना हावडापर्यंत तिकीट दिले. हावडा येथून गोड्डाला जाण्यासाठी बसने दहा हजार रुपये घेतले. तर गोड्डा हावडापासून 375 कि.मी. अंतरावर आहे. माझे जमा केलेले पैसे घरी पोहोचण्यात संपून गेले. मी तीन महिन्यांपासून घरी बसलो आहे. "

'23 ऑगस्ट रोजी माझ्या भावाचा मृत्यू झाला. मी बोकारो मध्ये होतो. मला माझ्या पत्नीचा फोन आला की परीक्षेची तारीख आली आहे. यासाठी ग्वाल्हेरला पायी जावे लागेल. मी माझ्या भावाच्या सर्व अंत्यविधीच्या सर्व क्रिया एका दिवसातच पूर्ण केल्या. गोड्डा येथे पोहोचलो. पण, कसे जायचे ते समजले नाही.'

'एकही पैसा नाही, वरून तिकीट काढलेली ट्रेनही रद्द झाली. मी जेव्हा माझ्या बायकोकडे गेलो तेव्हा ती म्हणाली, माझे दागिने गहाण ठेवा. दागिने गहाण ठेवून दहा हजार रुपये मिळाले. ज्यावर दरमहा 300 रुपये व्याज द्यावे लागेल. जर 12 महिन्यांत पैसे परत केले नाहीत तर दागिने देखील निघून जातील.'

'पैशांचा बंदोबस्त झाल्यानंतर आम्ही घरच्यांना म्हणालो की, आम्हाला जाण्यासाठी भागलपुरमधून गाडीची व्यवस्था झाली आहे. आम्ही आमचे घर गोड्डा येथून भागलपूरसाठी स्कूटीवरुन निघालो. मलाही आशा होती, मात्र जेव्हा आम्ही भागलपुरात पोहोचलो तेव्हा बसवाल्यांनी एका सीटचे अडीच हजार मागितले. आमच्याजवळ केवळ 10 हजार होते. मी पत्नीला म्हणालो तु काळजी करु नको. पुढे बस मिळेल. मी पत्नीला घेऊन स्कूटीवरच पुढे गेलो. कधी थांबात, कधी चालवत अशा प्रकारे मी घेऊन गेलो.'

'भागलपूरच्या बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सर्वत्र विनाश झाल्याचे दिसत होते. पुराचे पाणी सर्वत्र दिसत होते. मी माझ्या बायकोला सांगितले - तिकडे पाहू नको. मी गाडी चालवताना चेहरा झाकून बसून राहा. रात्रीचे दहा वाजले होते. आम्ही मुझफ्फरपूरला पोहोचलो होतो. पाऊसही पडत होता. दोघेही ओले आणि भुकेलेही होते. येथे एका लॉजमध्ये 400 रुपयांची खोली घेतली. रात्री 12 च्या सुमारास दोघेही झोपले.' - 'जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या पत्नीने मला बरे वाटत नसल्याचे म्हणाली. मी तिला सांगितले की हार मानू नका, मी तुला घेऊन जाईल. तुला आणि आपल्या बाळाला काहीच होणार नाही. देव आपली मेहनत पाहत आहे. पहाटे चारच्या सुमारास आम्ही दोघे लखनऊला निघालो.'

"कधीकधी सतत बसण्यामुळे, कधी कधी वाईट मार्गामुळे पत्नीचे पोट दुखत होते, परंतु आम्ही हार मानली नाही. रात्री नऊच्या सुमारास आम्ही लखनऊला पोहोचलो. तेथून एक्सप्रेस वे पकडून ग्वाल्हेरला निघालो. येथे आम्हाला 300 रुपये टोल भरावा लागला. एक्स्प्रेस वेवर दुकान नव्हते, ना पेट्रोल पंपही होता. आमची गाडी इतकी गरम होती की तुम्ही थोडे पेट्रोल टाकले असता तर त्याला आग लागली असती. सुमारे 150 किमी चालवल्यानंतर एक पेट्रोल पंप सापडला. तिथे एक हॉटेलही होते. "

'आम्ही पेट्रोल पंपावर स्कूटीमध्ये पेट्रोल टाकले आणि पेट्रोल पंपवाल्या लोकांना विचारले की आम्ही इथे झोपू शकतो का? ते म्हणाले की, तुम्ही हॉटेलसमोरील गार्डनमध्ये झोपू शकता. त्या हॉटेलमध्ये जेवणही खूप महाग होतं. आम्ही दोन चहा पिल्या, ज्यासाठी चाळीस रुपये लागले. तिथेच झोपलो सकाळी उठून दोन चहा घेतल्या आणि ग्वाल्हेरला निघालो. "

'30 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजल्यापासून आम्ही निघालो आणि दुपारी तीनच्या सुमारास ग्वाल्हेरला पोहोचलो. येथे 10 दिवसांसाठी 1500 रुपयांची खोली मिळाली. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही दोघे इथे आहोत, पण आता परीक्षा संपल्यानंतर परत जाण्याची चिंता आहे. आम्ही आधीच सात हजाराहून अधिक खर्च केला आहे. आता पाहू काय होते... सध्या येथे 7 दिवस रहायचे आहे. भविष्यात, काहीना काही व्यवस्था होईलच, आलो आहोत तसे परतही जाऊच... '