आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Wife Of Martyred Colonel Santosh Became Deputy Collector; Appointment By Telangana Government

गलवान:शहीद कर्नल संतोष यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी; तेलंगण सरकारकडून नियुक्ती

हैदराबाद21 दिवसांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत व चिनी सैन्यात रक्तरंजित हल्ल्यात कर्नल संतोष शहीद झाले होते

पूर्व लडाख सीमेवर भारत व चीनच्या जवानांत झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांची तेलंगण सरकारने उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना शासकीय नियुक्तीचे पत्र दिले. संतोषी यांना हैदराबाद अथवा जवळपासच्या जिल्ह्यात पदस्थापना दिली जाईल. तत्पूर्वी संतोषी यांच्या कुटुंबीयांना ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. कर्नल संतोष यांच्या पत्नी संतोषी ८ वर्षांची मुलगी व ३ वर्षांच्या मुलांसह सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. संतोषी यांनाच कर्नल संतोष शहीद झाल्याचे वृत्त समजले होते. शहीद कर्नल संतोष यांच्या आई हैदराबाद येथे वास्तव्यास आहेत.

भारत-चीनच्या जवानांत झाला होता संघर्ष

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चीनने अवैधपणे घुसखाेरी केल्याने भारत व चिनी सैन्यात रक्तरंजित हल्ले झाले. यात कर्नल संतोषसह लष्करातील २० जवान शहीद झाले होते. चीनचेही ४३ सैनिक व अधिकारी मारले गेले होते.

0