आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife's Death While Building A House; The Husband Entered The House By Erecting A Statue Of Her

कर्नाटक:घर उभारताना पत्नीचा मृत्यू; पतीने तिचा हुबेहूब पुतळा उभारून केला गृहप्रवेश

काेप्पल (कर्नाटक)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनी पत्नी माधवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा हुबेहूब पुतळा उभारला आहे. नव्या घरात प्रवेश करण्याआधी या प्रतिमेस झोक्यावर बसवले. सोहळ्यात मित्रपरिवार आला असताना मॅजेंटा साडी व सोन्याचे दागिने घालून झोक्यावर बसलेल्या माधवींना पाहून सर्व चक्रावून गेले. मात्र सत्य समोर आल्यानंतर ते श्रीनिवास यांच्या पत्नीप्रेमाने भारावून गेले.

नव्या घरात थाटात प्रवेश करावा, असे माधवींचे स्वप्न होते. मात्र जुलै २०१७ मध्ये एका रस्ते अपघातात माधवींचा मृत्यू झाला. गुप्ता म्हणाले, पत्नीविना हे घर सुने सुने राहिले असते. यामुळे तिच्या पुतळ्याची कल्पना आली. आता ती प्रत्येक क्षणी समोर असल्यासारखी वाटते. हा पुतळा इतक्या सफाईदारपणे घडवला आहे की माधवी या प्रत्यक्ष समाेर असल्याच्या भासतात. तो बंगळुरूचे कलाकार श्रीधर मूर्ती यांनी सिलिकॉनच्या माध्यमातून घडवला आहे.

बातम्या आणखी आहेत...