आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Election Result Updates । Horse Trading Congress MLA, Resort Politics, DK Shivkumar

सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले

बंगळुरू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (13 मे 2023) मतमोजणी सुरू आहे. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, मी आपल्या आमदारांना कुठेही घेऊन जात नाही, जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे काम करत राहू.

कर्नाटक विधानसभेचा संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गुरुवारी आणि शुक्रवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. शुक्रवारच्या बैठकीनंतर पत्रकारांनी शिवकुमार यांना विचारले की, ते आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नाही, सध्या ते फक्त निकालाची वाट पाहत आहेत. ते म्हणाले की आम्ही फक्त आमचे काम करत आहोत आणि आता निकालाची वाट पाहत आहोत.

एआयसीसीचे सरचिटणीस आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, डीके शिवकुमार आणि माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी बैठक घेतली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेदेखील पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. सध्या त्यांच्या हातावर उपचार सुरू आहेत.

2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि JD(S) यांनी युतीचे सरकार स्थापन केले. तथापि, 2020 मध्ये, अनेक काँग्रेस आणि जेडी(एस) आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली, ज्यामुळे काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पडले आणि भाजप सत्तेवर आला. त्यामुळे भाजपच्या संपर्कात येऊ नये म्हणून काँग्रेस आपल्या आमदारांना इतरत्र हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक विधानसभेत कोण बाजी मारणार, यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, मात्र एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित वृत्त

कर्नाटक विधानसभेचा निकाल लाइव्ह अपडेट्स :सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला