आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसंख्या नियंत्रण:दोन मुलांचे धोरण आणणार नाही : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली / मुकेश कौशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन मुलांचे धोरण आणणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भाजपचे सदस्य उदय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत हे उत्तर दिले.

विशेष म्हणजे शुक्रवारीच लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित खासगी सदस्यांची चार विधेयके सादर होणार होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचीच आसाम आणि उत्तर प्रदेशमधील सरकारे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार करण्याच्या तयारीत आहेत. ते पाहता केंद्रावरही असेच धोरण तयार करण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.

‘दोन मुलांचे धोरण आणण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? असा प्रश्न उदय प्रताप सिंह यांनी आरोग्य मंत्रालयाला विचारला होता. त्यावर मंत्र्यांनी ‘नाही’ असे मोजक्या शब्दांतच उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...