आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Will Not Join BJP Says Sachin Pilot, Congress Prepares For Expulsion Of Pilot May Announce New Congress State President For Rajasthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता माघार नाही:सचिन पायलट म्हणाले भाजपमध्ये जाणार नाही! नवीन पक्षाची करू शकतात घोषणा; काँग्रेसकडून हकालपट्टीची तयारी; पोस्टर हटवले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलट यांच्या नवीन पक्षाचे नाव 'प्रगतिशील काँग्रेस' असे राहणार असल्याची चर्चा

काँग्रेसपासून नाराज असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये सामिल होणार नाही असे सोमवारी स्पष्ट केले आहे. याचवेळी त्यांना काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. तत्पूर्वी सचिन पायलट यांनी राजस्थान सरकारमधील 30 आमदारांचा पाठिंबा असून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पायलट भाजपच्या संपर्कात असल्याचे पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच कळवले. अशात सचिन पायलट आपला नवीन पक्ष काढणार असल्याची चर्चा जोरात आहे.
पायलट आता भाजपवासी झाले -पीएल पुनिया

सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस सरचिटणीस पीएल पुनिया यांनी दिल्लीत म्हटले, की सचिन आता भाजपचे झाले आहेत. काँग्रेसच्या निवडून आलेल्या सरकारवर भाजपची काय भूमिका असते हे जगजाहीर आहे. काँग्रेसमध्ये सर्वच नेत्यांना मान सन्मान दिला जातो. यासाठी आम्हाला भाजपकडून सर्टिफिकेटची गरज नाही. याच दरम्यान, सचिन पायलट यांचे पोस्टर काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेरून हटवण्यात आले आहेत. पायलट यांच्याकडून आमदारांचे समर्थन आणि बंडखोरीची भाषा केली जात असली तरीही काँग्रेसचे सरकार तूर्तास पडेल असे दिसत नाही. गहलोत यांना अजुनही 109 आमदारांचा पाठिंबा आहे. त्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना आपले समर्थन पत्र दिले आहे. काँग्रेसचे राजस्थानचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासोबतच, पायलट यांच्याकडून तिसरी आघाडी सुद्धा तयार केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस एक तृतियांश आमदार पायलट यांच्या प्रस्तावित नवीन पक्षात सामील होऊ शकतात. या पक्षाची लवकरच पायलट यांच्याकडून घोषणा केली जाऊ शकते. 'प्रगतिशील काँग्रेस' असे पक्षाचे नाव असणार अशी चर्चा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser