आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2024 ची तयारी:तृणमूल काँग्रेस देशव्यापी होणार? अभिषेक बॅनर्जींकडे ‘राज्याभिषेका’ची धुरा

नवी दिल्ली / मुकेश कौशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममतांनी इतर राज्यांची जबाबदारी साेपवली भाचा अभिषेक बॅनर्जींकडे

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे वादळ राेखून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आता देशव्यापी झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून तृणमूलची पाळेमुळे इतर राज्यांतही राेवण्यासाठी तृणमूलने कवायत सुरू केली आहे. ही घाेडदाैड देशव्यापी करण्याची जबाबदारी ममतांनी पडद्याआड कार्यरत राहणारे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर साेपवली आहे. तृणमूलने गाेव्यात सगळ्या जागा लढवण्याचीही घाेषणा केली. याआधी ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दाैऱ्यात सर्व प्रमुख विराेधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन आपला उद्देश स्पष्ट केला हाेता.पक्षाचे मुखपत्र ‘जागाे बांगला’च्या १७ सप्टेंबरच्या अंकात काँग्रेसला सडलेल्या पाण्याचा तलाव सांगून राहुलएेवजी ममता हाच याेग्य पर्याय असल्याचा दावा करण्यात आला हाेता. बंगालमधील विजयानंतर काँग्रेसला सरळ लढतीत भाजपसाेबत लढू दिले जावे असा तृणमूलचा डाव हाेता. परंतु आता पक्षाने रणनीतीमध्ये बदल केला. म्हणूनच गाेव्यात सर्व जागा लढवणार असल्याची घाेषणा झाली. त्यावरून तृणमूलची देशव्यापी हाेण्याची इच्छाही लपली नाही. त्यासाठी तृणमूल देशभरात स्वत:ला ‘खरी काँग्रेस’ म्हणून लाेकांसमाेर मांडणार आहे. काँग्रेस कमकुवत असलेल्या राज्यांपासून सुरुवात केली जात आहे. अशा राज्यांत भाजपला पर्याय मिळत नाही.

अभिषेक यांनी २०२२ मध्ये त्रिपुरा व गाेव्याचा अभ्यास केस स्टडीसारखा हाती घेतला आहे. त्यासाठी पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल तसेच नव्या चेहऱ्यांना आणले जाणार आहे. प्रशांत किशाेर यांच्या निवडणूक रणनीतीने अभिषेक यांची टीम राज्यांत विस्तार करत आहे. तृणमूलला राष्ट्रीय पातळीवर नेण्यामागे स्वत: अभिषेक यांना राज्यात मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा ममता राष्ट्रीय नेता झाल्यानंतर पूर्ण हाेऊ शकते. याच रणनीतीनुसार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांना तृणमूलमध्ये आणून राज्यसभेत पाठवणे आणि बाबूल सुप्रियाे यांना भाजपमधून आणण्यात आले. तृणमूल बंगालचे माॅडेल ‘नाे व्हाेट टू बीजेपी’ची घाेषणा त्रिपुरा व गाेव्यातही नेणार आहे. बंगालच्या बाहेर गेलाे नाही तर ममतांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण हाेऊ शकणार नाही. हीच रणनीती आम आदमी पार्टीचीदेखील आहे. आप पंजाबमध्ये टक्कर दिल्यानंतर आता गाेव्यातही हळूहळू पाय पसरू लागली आहे. गाेव्यात आता तृणमूलमुळे तिरंगी लढत हाेणार आहे. एकूणच गाेव्याची निवडणूक तृणमूल व आपसाठी महत्त्वाची आहे. कारण दाेन्ही पक्षांना राष्ट्रीय आेळख मिळवायची आहे.

तृणमूलने प्रचारावरखर्च केले १५४ काेटी
पश्चिम बंगालमध्ये यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प्रचार माेहिमेवर १५४.२८ काेटी रुपये खर्च केले हाेते. तामिळनाडूत एआयएडीएमकेला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या द्रमुकने प्रचारावर ११४.१४ काेटी रुपये खर्च केले हाेते, अशी माहिती निवडणूक आयाेगाने राजकीय पक्षांकडून झालेल्या खर्चाच्या तपशिलात दिली. भाजपने मात्र या खर्चाची माहिती दिली नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत सत्तेवरील एआयडीएमकेने तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रचार करून एकूण ५७.३३ काेटी खर्च केले हाेते. काँग्रेसने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू, बंगालमध्ये ८४.९३ काेटी रुपये खर्च केले. बंगालमधील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. आता तृणमूलच्या वाटचालीस महत्त्व आले आहे.

त्रिपुरा-गाेव्यात नव्या व्हाेट बँकेचा शाेध..
त्रिपुरात तृणमूलसाठी भाषिक व पारंपरिक डाव्यांची व्हाेट बँक तयार आहे. बांगला भाषिक क्षेत्रांत तृणमूलला पाळेमुळे पक्की करता येऊ शकतील. भाजपच्या विराेधातील डाव्यांची व्हाेट बँकही अशाच शाेधात हाेती. म्हणूनच त्रिपुरात तृणमूलला वाट साेपी वाटत असावी. गाेव्यात मात्र उमेदवारावर बरेच काही अवलंबून असेल. तृणमूल तरुण चेहरा व विजयी हाेण्याची शक्यता असलेल्या उमेदवारावर डाव खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...