आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Winter Session | Congress | Mamata Begins Preparation Of Sonia's Independent Strategy; Minister Of State For Home Affairs Mishra Resigns, Demands Arrest

संसदीय अधिवेशन ::ममता, सोनियांची स्वतंत्र रणनीतीची तयारी सुरू; शेतकरी प्रश्नावर भर गृह राज्यमंत्री मिश्रांचा राजीनामा, अटकेची मागणी

मुकेश काैशिक । नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विराेधी पक्षाने आपली रणनीती तयार केली आहे. फेब्रुवारीत उत्तर प्रदेश व पंजाबव्यतिरिक्त तीन महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुकीकडे पाहता या सत्रात विराेधी पक्ष व सरकार यांच्यात आरपारची लढाई हाेण्याची शक्यता आहे. साेमवारपासून सुरू हाेणाऱ्या अधिवेशनासाठी काँग्रेस नेत्या साेनिया गांधी दाेन्ही सभागृहांतील पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठक घेणार आहेत.

त्यात पंधरा दिवसांच्या रणनीतीला अंतिम रूप देणार आहेत. तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी दाेन दिवसांपासून राजधानीत डेरेदाखल आहेत. त्यात इतर विराेधी पक्षांसमवेत हिवाळी अधिवेशनासाठीची रणनीती आखण्याच्या तयारीला लागल्या आहेत. संसदेचे मान्सून अधिवेशन पेगासस फाेन हेरगिरी प्रकरणामुळे गदाराेळात संपले हाेते. या मुद्द्यावर सर्वाेच्च न्यायालयाची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या निष्कर्षाची आम्ही प्रतीक्षा करत आहाेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. त्यामुळेच काँग्रेसने आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर माेदी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेवरून गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी व अटकेच्या मागणीवर काँग्रेस भर देऊ शकताे.

संसदेतील पक्षाचे एक ज्येष्ठ नेते ‘भास्कर’ला म्हणाले, शेतकऱ्यासंबंधी हमीभाव इतर मुद्द्यांवरून पक्ष लाेकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे. पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करण्याची घाेषणा केल्यानंतर पुढील पावले टाकण्याची विराेधक तयारी करत आहेत. परंतु पहिल्याच दिवशी हे कायदे रद्द करत असल्याचा प्रस्ताव मांडून सरकार वातावरण थंड करण्याच्या विचारात आहे.

पुढाकार म्हणून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जाेशी २८ नाेव्हेंबर राेजी सर्वपक्षीय बैठक घेतील. सरकारसाठी काही इतर विधेयकांना पारित करणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात अमली पदार्थासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे. त्याशिवाय सीबीआय व दक्षता संचालनालय प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याची व्यवस्था करणारा प्रस्तावही पारीत केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...