आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • With Less Than 67,000 Active Cases In 21 Days, The Situation Could Return To Normal By The End Of March

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:21 दिवसांत 67 हजार अॅक्टिव्ह केस झाल्या कमी, हाच वेग राहिला तर मार्चच्या अखेरपर्यंत परिस्थिती होऊ शकते सामान्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 58 दिवसांमध्ये परिस्थिती नॉर्मल होऊ शकते.

देशात कोरोना अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गुरुवारी 14,472 नवीन संक्रमित आढळले, 17,726 बरे झाले आणि 161 जणांचा मृत्यू झाला. अॅक्टिव्ह केसमध्ये 3,420 ची घट झाली आहे. या महिन्यात 21 दिवसांमध्ये 66,873 अॅक्टिव्ह केस म्हणजेच प्रत्येक दिवशी जवळपास 3,184 रुग्ण कमी झाले आहेत. सध्या 1.85 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण याच वेगाने कमी झाले तर 58 दिवसांमध्ये परिस्थिती नॉर्मल होऊ शकते. तेव्हा रोज मोजकेच प्रकरणे येतील.

देशात आतापर्यंत 1.06 कोटी केस आल्या आहेत. यामधून 1.02 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.53 लाख रुग्णांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

कोरोनाने सर्वात जास्त प्रभावीत महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या गुरुवारी 20 लाखांच्या पार गेली आहे. ही संख्या जगातील 10 वा सर्वात जास्त प्रभावित देश जर्मनीच्या संक्रमितांपेक्षा केवळ एका लाखांनी कमी आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 21.09 लाख केस आल्या आहेत.

तर राज्यात गुरुवारी 2,886 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3,980 रुग्ण बरे झाले आणि 52 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 19 लाख बरे झाले आहेत. तर 50,634 संक्रमितांनी जीव गमावला आहे. 45,622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.