आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Withdrawal Of Indian, Chinese Troops From Gogra Hot Spring Area In Ladakh Army Chief

बंकर उद्ध्वस्त होणार:लडाखमध्‍ये गोगरा हॉट स्प्रिंग क्षेत्रापासून भारत, चीनच्या सैन्याची माघार - लष्करप्रमुख

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर गोगरा हॉटस्प्रिंग पेट्रोलिंग पोइंट-१५ पासून करारानुसार भारत तसे चिनी सैन्य मागे हटले आहे. सोमवारी यावर सहमत झाले. दोन दिवसीय लडाख दौऱ्याहून दिल्लीत परतलेले लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मागे हटण्याची प्रक्रिया नियोजित वेळेनुसार होत आहे.

शनिवारी लष्कर प्रमुखांनी भारत-चीन लडाख सीमेशी संबंधित सुरक्षेच्या मुद्यावर बैठक बोलावली. पूर्व लडाख सीमेवर ५ मे २०२० रोजी पेच निर्माण झाला होता. पँगाँग तलावाच्या जवळ भारतीय सैन्य व चिनी सैन्यात धुमश्चक्री झाली होती. या भागात सातत्याने दोन्ही सैन्याकडून सैन्य तैनाती वाढवली जात होती. परंतु आता कराराअंतर्गत कारवाई होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिदंम बागची म्हणाले, भारत व चीन दोन्ही देश या भागातील अस्थायी बंकरला उद्ध्वस्त करण्याविषयी सहमत झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...