आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Within 15 Months After The Death Of Sushant Singh, NCB Registered 129 Cases, 279 People Arrested

एका प्रकरणाने संपूर्ण एजन्सीची दिशा बदलली:सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर 15 महिन्यांत NCB ने 129 गुन्हे नोंदवले, 279 जणांना अटक

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) गेल्या 15 महिन्यांपासून चर्चेत आहे. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ऑगस्ट 2020 मध्ये या प्रकरणाचा तपास ड्रग्जच्या अँगलने सुरू झाला आणि तेथून एनसीबीचा दृष्टिकोन बदलला. 2017, 2018 आणि 2019 मध्ये म्हणजे तीन वर्षांत, ज्या एजन्सीने एकूण फक्त 90 प्रकरणे नोंदवली आणि 143 लोकांना अटक केली होती.

याच एजन्सीने जून 2020 ते सप्टेंबर 2021 या 15 महिन्यांत 129 प्रकरणे नोंदवली आणि 279 लोकांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, करण जोहर, अर्जुन रामपाल यांसारख्या अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांवरही गदा आली. मात्र, यामुळे एनसीबीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नियम काय सांगतो...
चरस-गांजा-हेरॉईन यांसारखी 237 प्रकारची मादक द्रव्ये विकणे-खरेदी-पाळणे-शेती करणे-उत्पादन आणि सेवन करणे... सर्व बेकायदेशीर.

एनसीबी दीपिका, करण जोहरसह 12 सेलिब्रिटींपर्यंत पोहोचली; 11 जणांची चौकशी, 8 जणांना क्लीन चिट, 3 रडारवर
दीपिका पदुकोण
आरोप
- 28 ऑक्टोबर 2017 मध्ये ड्रग चॅटमध्ये नाव आले. दीपिकाने मॅनेजर करिश्माला विचारले होते- माल आहे का?
ॲक्शन - चौकशी झाली, ड्रग चॅट मान्य केली.
सध्या स्टेटस - क्लिनचीट.

करण जोहर
आरोप
- एक वर्षांपूर्वी करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दिपीकासहित अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
ॲक्शन - नोटीस पाठवण्यात आली, परंतु चौकशीसुद्धा झाली नाही.
सध्या स्टेटस - क्लिनचीट.

श्रद्धा कपूर
आरोप -
छिछोरे चित्रपटाच्या पार्टीत ड्रग घेतल्याच आरोप.
ॲक्शन - समन्स पाठवण्यात आला. जवळपास 6 तास चौकशी झाली. ड्रग घेतल्याचे मान्य केले नाही.
सध्या स्टेटस - क्लिनचीट

सारा अली खान
आरोप
- केदारनाथच्या सेटवर ड्रगचे सेवन केले. रिया चक्रवर्तीने साराचे नाव घेतले होते.
ॲक्शन - जवळपास 5 तास चौकशी झाली. ड्रग घेतल्याचे मान्य केले नाही.
सध्या स्टेटस - क्लिनचीट

भारती सिंह
आरोप
- 21 नोव्हेंबर 2020 रोजी टीव्ही स्टार भारती सिंह आणि पती हर्ष यांच्या घरावर छापा. 86.5 ग्राम गांजा जप्त.
ॲक्शन - अटक झाली. गांजा घेतल्याचे मान्य केले.
सध्या स्टेटस - जामिनावर बाहेर

अर्जुन रामपाल
आरोप
- गर्लफ्रेंड गॅब्रिलियाचा भाऊ आगीसील्सला ड्रग केसमध्ये अटक.
ॲक्शन - अर्जुन रामपालच्या घराची झडती घेण्यात आली. चौकशीही झाली.
सध्या स्टेटस - क्लिनचीट

आर्यन खान
आरोप
- 2 ऑक्टोबरला मुंबईवरून गोव्याला चाललेल्या क्रुझवरील ड्रग पार्टीत सहभाग.
ॲक्शन - 5 दिवस चौकशी झाली. 22 दिवस तुरुंगात.
सध्या स्टेटस - जामिनावर

अनन्या पांडे
आरोप
- आर्यनसोबत ड्रग चॅटचा आरोप. आर्यनने तिला विचारले होते- काही जुगाड होऊ शकतो का? अनन्या म्हणाली- मी अरेंज करते.
ॲक्शन - 3 वेळेस चौकशी.
सध्या स्टेटस - रडारवर

..आणि इकडे 21 हजार कोटीचे 3000 किलो हेरॉईन कोणाचे? एक सुगावा देखील नाही
मुंबईतील चित्रपटसृष्टीतील व्यक्तींकडून 10-20 ग्रॅम ड्रग्ज पकडणाऱ्या एनसीबीला देशातील सर्वात मोठ्या ड्रग्जच्या खेपाची माहितीही नव्हती. 16 सप्टेंबर 21 रोजी गुजरातमधील मुंद्रा बंदरात डीआरआयने 21 हजार कोटी रुपयांचे तीन हजार किलो हेरॉईन पकडले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते कोणाचे आहे हे अद्याप कळले नाही? यावरून राजकारणही तापले आहे. NCB ने 18 महिन्यांपासून पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती न करण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...