आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Witter Revealed Rahul Gandhi Tweet Minor Girl Rape And Murder Relatives Identity; News Amd Live Updates

राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई:ट्विटरने काँग्रेस नेत्याचे हटवले ट्विट; दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी केली कारवाई

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडितेला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहू - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केली. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख समोर येत असल्याने ट्विटरने हे फोटो हटवले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या ट्विटबाबत दिल्ली पोलिस आणि ट्विटरकडे तक्रार केली होती. एनसीपीसीआरने पीडितेच्या कुटुंबाचे फोटो पोस्ट केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे बाल न्याय कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

पीडितेला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहू - राहुल गांधी
दिल्लीतील कँट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी बुधवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले की, कुटुंबाला दुसरे काही हवे नसून फक्त न्याय हवा आहे. सध्याच्या परिस्थितीत पीडित कुटुंबाला मदतीची गरज आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी उभे राहू असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
दिल्लीतील जुणे नांगल गावात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुनील आणि सविता (नाव बदलले आहे) यांच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केले. त्यानंतर आरोपीने 1 ऑगस्ट रोजी पीडीत मुलीची हत्या करत तीला जाळले होते. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली असून मुलीला न्याय मिळवण्यासाठी लोक आंदोलन करत आहे. सदरील घटनेत पोलिसांनी आतापर्यंत पुजारीसह 4 जणांविरोधात बलात्कार, खून आणि धमकी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्यांतर्गतही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपींनी घातलेल्या कपड्यांपासून डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु, मृतदेहाचे फक्त जळलेले अवशेष असल्याने कोणतेही ठोस निष्कर्ष काढता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...