आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील पंजाबी बागेत बुधवारी संध्याकाळी एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आला. एका नाल्यात एक सुटकेस पडून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती.
एका पथकाने सुटकेस नाल्यातून बाहेर काढली. त्यात एक कुजलेला मृतदेह आढळून आला. महिलेची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वय अंदाजे 28-30 वर्षे आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी हा खून 8 ते 10 दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता व्यक्त केली. या महिलेची ओळख पटवण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे.
सुटकेसमध्ये आढळला मुलीचा नग्न मृतदेह
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर हायवेवरील वर्दळीच्या इफको चौकात एका तरुणीचा सुटकेसमध्ये विवस्त्र मृतदेह आढळला. तो चौकातील झाडीत टाकण्यात आला होता. डेडबॉडी नग्नावस्थेत आढळल्यामुळे बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी
दिल्लीत लिव्ह-इन पार्टनरची हत्या
दिल्लीच्या टिळक नगरात शुक्रवारी एका महिलेची चाकू भोसकून निघृण हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह किरायाच्या घरात आढळला. रेखा राणी असे मृत महिलेचे नाव असून, ती आरोपीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिला 16 वर्षांची एक मुलगीही आहे. महिलेचा चेहरा, गळा व हातावर चाकूने वार करण्यात आलेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
एक्स बॉयफ्रेंडने खून करुन सुटकेसमध्ये ठेवला मृतदेह
आपण आपल्या आयुष्यात घेतलेला चूकीचा निर्णय एक वाईट अनूभव किंवा आपल्या जीवासोबत खेळून जातो. असाच एक वाईट प्रकार रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर सोबत घडला आहे. ज्याची किंमत ग्रेटाला आपला जीव गमावून मोजावी लागली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्यादिमीर पुतीन यांना मनोरूग्ण म्हटले गेले. तेव्हा ग्रेटा ही सर्वात जास्त चर्चेत आली होती. कारण व्यादिमीर पुतीन यांना मनोरूग्ण म्हणणारी ग्रेटा ही पहिलीच व्यक्ती होती. ग्रेटा आणि तीच्या एक्स बॉयफ्रेंडमध्ये वाद झाल्याने या वादातून तिची हत्या करण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रेटाच्या मृत्यूचा पुतीनशी काहीही एक संबंध नाही. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.