आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Woman In Kolkata, Suffering From Rare Syndrome Called Androgen Insensitivity Syndrome Doctor Discovers She Is A "Man"

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्मिळ आजार:पोटदुखीनंतर डॉक्टरांकडे गेलेल्या महिलेला ती 'पुरुष' असल्याचे समजले; डॉक्टर म्हणाले- 22 हजारांमध्ये एक प्रकरण असते

कोलकाता10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • महिलेची बहिण आणि कुटुंबातील इतर दोन महिलांनाही हा दुर्मिळ आजार

कोलकाताच्या बीरभममधून एक दुर्मिळ प्रकरम समोर आले आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर 30 वर्षीय महिलेला अचानक समजले की, ती महिला नसून 'पुरुष' आहे आणि टेस्टिकुलर कँसर (अंडकोशातील कँसर) पीडीत आहे. महिलेवर कोलकाताच्या सुभाष चंद्र बोस कँसर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ट्रिटमेंट करणारे डॉ. अनुपम दत्ता यांचे म्हणने आहे की, शारीरिक बनावट जसे ब्रेस्ट, आवाज आणि गुप्तांगाने ती महिला आहे, पण तिच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय नाही. हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत अँड्रोजन इनसेंसटिविटी सिंड्रोम म्हटले जाते.

काय आहे अँड्रोजन इनसेंसटिविटी सिंड्रोम

ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ही तेव्हाच बनते, जेव्हा गर्भात भ्रूणाचे जननांग विकसित होत असतात. जन्मजात अँड्रोजन इनसेंसटिविटी सिंड्रोमसोबत जन्म घेणारे बाहेरून महिला असतात, पण आतून पुरुष असतात. काही प्रमाणात बाहेरुनही पुरुष आणि महिलेसारखे दिसू शकतात. जानकारांनुसार, 22 हजार लोकांमध्ये 1 प्रकरण असे असू शकते.

9 वर्षांपूर्वी झाले लग्न

9 वर्षांपूर्वी महिलेचे लग्न झाले होते. अँड्रोजन इनसेंसटिविटी सिंड्रोम असूनही तिला काहीच त्रास नव्हता. काही महिन्यापूर्वी तिला पोटातील खालच्या बाजुस तीव्र त्रास झाल्यानंतर सुभाष चंद्र बोस कँसर हॉस्पिटलला गेली. तपास करणारे डॉ. अनुपम दत्तानुसार, महिलेला आतापर्यंतर एकदाही पीरियड्स (मासीक पाळी) आली नाही. याप्रकरणानंतर महिलेल्या बहिणी टेस्ट करण्यात आली, तिलाही अँड्रोजन इनसेंसटिविटी सिंड्रोम असल्याचे समोर आले. यासोबतच कुटुंबातील आणखी दोन महिलांनाही हा आजार असल्याचे समजले.

महिलेला दुर्मिळ कँसर असल्याचे समोर आले

डॉ. दत्तानुसार, पोटदुखीच्या तक्रारीनंतर आम्ही तपासले. रिपोर्टमध्ये समोर आले की, महिलेला टेस्टिकल्स (वीर्यकोष) आहेत. यानंतर तिच्या बायोप्सीने स्पष्ट झाले की, महिलेला टेस्टिकुलर कँसर आहे. याला 'सेमिनोमा'देखील म्हटले जाते. सेमिनोमा टेस्टिसमध्ये होणारा दुर्मिळ कँसर आहे. सध्या महिलेची कीमोथेरेपी केली जात असून, तिची प्रकृती स्थिर आहे.

वीर्यकोष विकसित झाले नाही

डॉ. दत्तानुसार, महिलेमध्ये टेस्टिकल्स (वीर्यकोष) पूर्ण पणे विकसित झाले नाही. मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन रिलीज झाला नाही. तिच्यात फीमेल हार्मोन रिलीज झाल्यामुळे ती महिलेप्रमाणे दिसते. ती एक महिला म्हमूनच वाढली, 9 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. सध्या आम्ही तिची आणि तिच्या नवऱ्याची कौंसलिंग करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...