आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये एक विचित्र घटना उजेडात आली आहे. एका पतीने आपली पत्नी घरमालकासोबत लूडो खेळताना स्वतःला हरल्याचा दावा केला आहे. पतीने रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
महिलेचा पती दुसऱ्या शहरात काम करतो. महिला भाड्याच्या घरात राहते. ती तिथेच आपल्या घरमालकासोबत लूडो व पत्ते खेळत होती. लूडोत तिने आपले सर्व पैसे व दागिणे गमावले. त्यानंतर तिने स्वतःला पणाला लावले असता ती ही हरली.
पतीला फोन करून सांगितले - आता येथे येऊ नको
पतीच्या माहितीनुसार, पत्नीने स्वतःच आपल्याला ही माहिती दिली. तसेच आता येथे न येण्याचाही सल्ला दिला. पती म्हणाला -आपण लूडोत हरल्याची बाब पत्नीने स्वतः मला सांगितली. तसेच तिने मला येथे येण्यासही नकार दिला. येथे आले, तर ते लोक तुम्हाला ठार मारतील असे ती म्हणाली. या घटनाक्रमानंतर पतीने आता आपली पत्नी परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडे याचना करत आहे.
दुसरीकडे, पत्नीने त्याचा दावा फेटाळून लावला आहे. ती म्हणाली - पती मला दररोज मारहाण करतो. मी दुसऱ्यांच्या घरात काम करून स्वतःच्या मुलांचे पालनपोषण करते. पती मला छदामही देत नाही.
पती दुसऱ्या शहरात करतो मजुरी
प्रकरण प्रतापगडच्या देवकली पोलिस ठाण्याचे आहे. पत्नीचे नाव रन्नू आहे. तिचा पती उमेश जयपूर व दिल्लीत मजुरी करतो. या दाम्पत्याला 2 मुलेही आहेत. उमेश जवळपास वर्षभरापूर्वी कामासाठी प्रतापगडबाहेर गेला होता.
पतीने सांगितले की, तो शहराबाहेर गेल्यानंतर त्याच्या पत्नीला लूडो व पत्ते खेळण्याची सवय लागली. रविवारी उमेशने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याने कोणत्याही स्थितीत आपली पत्नी परत मागितली आहे.
पती म्हणाला -रन्नूनेच खेळात हरल्याचे सांगितले
उमेशने पोलिसांना सांगितले - 'पत्नी रन्नू लूडो व पत्ते खेळते. मी कामासाठी दुसऱ्या शहरात राहतो. पत्नीने पैशांची मागणी केली, तर ते ही देतो. ती पैसे खेळण्यासाठी मागत असल्याचे मला ठावूक नव्हते. कंत्राटी मजूर असल्यामुळे माझे घरी येणे कमी होत होते. त्यामुळे या गोष्टींची माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वीच पत्नीने मला फोन करून लूडोत हरल्याची माहिती दिली. तेव्हा तिने मला येथे आल्यास तुम्हाला ठार मारले जाईल असे सांगितले होते.'
माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, पत्नी परत मिळून द्या
उमेश पुढे म्हणाला की, 'त्यानंतर मी सातत्याने पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण माझे तिच्याशी बोलणे झाले नाही. मी माझ्या घरमालकालाही फोन केला. पण त्याचेही माझ्याशी बोलणे झाले नाही. मी कसेतरी घरमालकाच्या आईशी बोललो. तेव्हा त्यांनी आपला मुलगाही घरातून बेपत्ता असल्याचे सांगितले.
मला कामावरून सुट्टी मिळत नव्हती. मी कसेतरी रविवारी प्रतापगडला पोहोचलो. त्यानंतर थेट पोलिस ठाण्यात आलो. मला माझी पत्नी परत हवी आहे. मला दोन मुले आहेत. माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल.'
पत्नीचा दावा -पती मारतो, पैसेही देत नाही
या प्रकरणी पत्नी रन्नूचीही बाजू उजेडात आली आहे. तिने पोलिसांना सांगितले - 'मी कुठेच गेले नव्हते. स्वतःच्याच घरात होते. पती माझ्यावर खोटे आरोप करत आहे. तो आम्हाला मारहाण करतो. घर चालवण्यासाठीही पैसे देत नाही. ती खूप काळापासून घरीही आला नाही. आता आला तर असे आरोप करत आहे. मला लूडो व पत्ते खेळता येत नाही. त्यामुळे स्वतःला हरण्याचा प्रश्नच येत नाही. मी तर येथे दुसऱ्यांच्या घरचे काम करून आयुष्य कंठत आहे.'
पोलिसांकडून घरमालकाचा शोध
सीओ सिटी शुभेंदू गौतम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले - 'आम्ही पती व पत्नीचे म्हणणे ऐकले. चौकशी सुरू आहे. त्या आधारावर पुढील तपास केला जाईल. दुसरीकडे, पतीने हे संपूर्ण प्रकरण पैशाच्या व्यवहारातून घडल्याचेही सांगितले आहे. पतीने घरमालकाकडून कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे. आम्ही घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत.'
घरमालकाशी झाला अनेकदा वाद
या प्रकरणी शेजाऱ्यांनी सांगितले की, 'उमेश मजुरीसाठी घराबाहेर राहतो. रन्नूला आम्ही अनेकदा घरमालकासोबत पाहिले. तिला आपल्या पतीशी फारसे देणेघेणे नाही. आम्ही अनेकदा त्यांना एकत्र बसून मोबाइलमध्ये काहीतरी करताना पाहिले. पण तेव्हा आम्हाला गेम खेळत असल्याचे माहिती नव्हते.
रन्नू कुणाशीही जास्त बोलत नव्हती. तिचे मुलेही घरातून फार बाहेर पडत नव्हते. या प्रकरणी काहीवेळा घरमालकाशी वादही झाला. त्यानंतर तिने त्याच्या घरी जाणे सोडले नाही. ते एकत्रच घराबाहेर जात होते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.