आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Woman Who Torched Herself In Front Of Uttar Pradesh CM Office Is Dead, Daughter Serious

'त्या' महिलेचा मृत्यू:विधानसभा परिसरात स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा 4 दिवसानंतर मृत्यू, पोलिसांच्या कारवाईवर होती नाराज

लखनऊ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांचा दावा, प्रशासन आणि सरकारला बदनाम करण्याचा कट; भडकावणाऱ्यांना अटक
Advertisement
Advertisement

उत्तर प्रदेश विधानसभा परिसर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या महिलेची चौथ्या दिवशी मृत्यूशी झुंज संपली. या घटनेतील महिला सोफियाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर तिची मुलगी गुडिया हिची प्रकृती अजुनही नाजूक आहे. सोफिया आणि तिची मुलगी गुडिया यांनी 17 जुलै रोजी स्वतःला पेटवून घेतले होते. यात सोफिया 80 टक्के तर गुडिया 20 टक्के भाजली होती. या दोघींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शेजाऱ्यांशी भांडणानंतर पोलिसांच्या कारवाईवर होती नाराज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी नाल्यावरून सोफिया आणि तिच्या शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. यानंतर सोफियाने शेजाऱ्याच्या मुलासह 4 जणांविरुद्ध पोलिसांत छेडछाडीची तक्रार दिली होती. यानंतर सोफिया आणि गुडियासह एकूण तीन जणांवर शेजाऱ्याने सुद्धा तक्रार दाखल केली होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी आपल्यावर अन्याय केला असे आरोप सोफियाने केले होते. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल अमेठीतील 3 आणि लखनऊ येथील 4 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. यासोबतच आई आणि मुलीला आत्मदहनासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी एका नेत्यासह 3 जणांना अटक करण्यात आली. तसेच इतर काही संशयितांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांचा दावा, प्रशासन आणि सरकारला बदनाम करण्याचा कट

पोलिसांनी या प्रकरणात आपली बाजू मांडताना त्या महिलेला आत्महत्येसाठी प्रोत्साहित करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. काही लोक मुद्दाम आई आणि मुलीला भडकावून प्रशासन आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोफिया आणि तिच्या मुलीला आसमा आणि सुल्तान हेच दोघे अमेठीतून लखनऊमध्ये घेऊन आले होते. हे दोघे अमेठीतील रहिवासी आहेत. लखनऊमध्ये कादिर, कबीर आणि अनूप यांनी देखील सोफिया आणि गुडियाला आत्मदहनासाठी भडकावले असा दावा पोलिसांनी केला आहे.

Advertisement
0