आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेंड:छोट्या शहरांच्या महिला जास्त ऑनलाइन, नव्या खरेदीदारांत त्यांचा 43 टक्के वाटा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांची स्मार्ट फोनपर्यंतची पोहोच खूप सोपी झाली आहे. त्यामुळे आता ब्रँड्स टियर-२ व टियर-३ शहरांत महिलांना महत्त्व देत आहेत. ब्रँड्सचे म्हणणे आहे की, या खरेदीदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नव्हतो.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार, भारतीय महिला इंटरनेट मार्केटप्लेसवर वेगाने आपले अस्तित्व नोंदवत आहेत. याशिवाय महामारीनंतर ४३ टक्के नव्या खरेदीदार याच महिला आहेत. तज्ज्ञांच्या मते, टियर-२ आणि टियर-३ शहरांत इंटरनेटची पोहोच, प्रवास आणि समृद्धीसारख्या विविध कारणांमुळे महिलांची उपस्थिती महत्त्वपूर्णरीत्या वाढली आहे. तथापि, मेट्रो शहरांच्या तुलनेत ती कमी आहे. त्यामुळे ब्रँड्स इथे आपले स्थान निर्माण करू शकतात. ब्राइट एन्जल्सच्या कन्सल्टंट निशा संपत सांगतात, या संभाव्य ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी ब्रँड्स नव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. उदाहरणार्थ अनेक फॅशन ब्रँड छोट्या शहरांत रोड शोचे आयोजन करत आहेत. याच्या माध्यमातून येथील नव्या खरेदीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. एफएमसीजी ब्रँडही या मार्गावर आहेत. मॉम्सप्रेसोचे सहसंस्थापक प्रशांत सिन्हा सांगतात, एफएमसीजी ब्रँड आक्रमक पद्धत अवलंबत आहेत. यासाठी ते माय मनी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. याचा फोकस ‘वर्ड ऑफ माऊथ मार्केटिंग’वर आहे.

या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या ग्राहकांशी एखाद्या विशेष उत्पादनावर बोलणारे लोक आहेत. उत्पादनाला चालना देण्यासाठी या महिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यामुळे ब्रँड्सना २ टियर आणि ३ टियर शहरांत पोहोचण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते, वर्षागणिक नॉन मेट्रो शहरांत महिलांमध्ये स्मार्टफोनची पोहोच वाढली आहे. महामारीने महिलांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर सोपाही केला आहे. इतकेच नाही तर गृहिणींनीही करमणुकीच्या पुढे जाऊन खरेदीत ऑनलाइन माध्यमांचा वापर सुरू केला आहे. मध्यम आणि जास्त खरेदी करणाऱ्या बहुतांश ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला असल्याचेही अहवालात म्हटले आहे. ही संख्या छोट्या शहरांपेक्षाही जास्त असू शकते.

बातम्या आणखी आहेत...