आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात पहिल्यांदाच लठ्ठपणाचे खरे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण-५ दरम्यान या वेळी उंची-वजनासह कंबर-पार्श्वभागाचे गुणोत्तरही (डब्ल्यूएचआर) मोजले. सर्वाधिक म्हणजे ८८ टक्के जम्मू-काश्मीरच्या महिलांमध्ये हे गुणोत्तर बिघडल्याचे दिसते. सर्वात कमी गुणोत्तर मध्य प्रदेशमध्ये ४० टक्के आहे. पुरुषांचा विचार केल्यास चंदीगडमध्ये हे गुणोत्तर-प्रमाण बिघडल्याचे दिसते. तेथे ६७ टक्के पुरुष धोक्याच्या रेषेत आहेत. सर्वाधिक तंदुरुस्त महिला बिहार-झारखंडमध्ये (२६%) आहेत. २५% सडपातळ महिलांसह गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक ४१% लठ्ठ महिला पंजाब-दिल्लीत आहेत.
संपत्ती-लठ्ठपणाचे ‘नाते’: कमी संपत्ती असणाऱ्या २८% महिला, तर १०% श्रीमंत महिला फिट
सर्व्हेदरम्यान लठ्ठपणा आणि संपत्तीतील एक अनोखा ट्रेंड समोर आला. देशातील श्रीमंत वर्गात फक्त १०% महिला तंदुरुस्त आहेत, तर कमी संपत्ती असलेल्या कुटुंबात अशा महिलांची संख्या तब्बल २८ टक्के इतकी आहे.
कंबर-पार्श्वभागाचे गुणोत्तर-प्रमाण : कंबर-पार्श्वभागाच्या गुणोत्तरामुळे जोखीम वयाच्या वाढीसोबतच वाढल्याचे दिसले. १५ ते १९ वयोगटातील ४६ टक्के तरुणी जोखमीच्या गटात मोडतात, तर ४० तेे ४९ वयोगटात हे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ग्रामीणमध्ये ५५%, शहरांत ६० % लोक चुकीच्या गुणोत्तर-प्रमाणामुळे रोगांच्या कचाट्यात सापडत आहेत.
फिटनेस घटतोय : वयाबरोबर तंदुरुस्त महिलांची संख्या घटत जाते. सर्व्हेनुसार १५ ते १९ वयोगटात तंदुरुस्त युवती ४० टक्के आहेत, तर ४० ते ४९ वयोगटात फक्त ९% महिला तंदुरुस्त आढळल्या. ग्रामीणमध्ये फिट महिला (२१%), शहरांच्या (१३%) तुलनेत अधिक आढळल्या.
कमरेचा घेर वाढल्यास अनेक संकटांना आमंत्रण...
शरीरात जेव्हा कोणत्याही प्रकारची सूज वाढते तेव्हा संकटे वाढतात. कमरेचा घेर वाढल्यास इन्सुलिन निर्मितीत अडथळा येतो. त्यामुळे नुकसानकारक हार्मोन्स एकत्र येऊ लागतात. लिपिड प्रोफाइलमध्ये गडबड होऊ लागते. गुड कोलॅस्टेरॉल बॅड कोलेस्टेरॉलमध्ये परावर्तित होत जाते. त्यामुळे रक्तदाब वाढून थेट हृदयावर विपरीत परिणाम होतात.
- नीरज निश्चल, असोसिएट प्रोफेसर, मेडिसिन विभाग, एम्स, नवी दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.