आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफतची साडी बेतली जीवावर:साड्या आणि धोतराचे मोफत वाटप सुरू असताना चेंगराचेंगरी, 4 महिलांचा मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील तिरुपत्तूर येथील वनीयंबादी येथे शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला. येथे थापूसम सणानिमित्त एक व्यक्ती मोफत साड्या आणि वेष्टी (पांढरे धोतर) टोकन वाटप करत होता. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. या अपघातात काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

तामिळ समुदाय थायपुसम सण साजरा करतात. भगवान मुरुगन यांची जयंती आहे. भगवान मुरुगन हे कार्तिकेय आहेत. भगवान शिव आणि देवी पार्वतीचा धाकटा मुलगा. असे मानले जाते की, या दिवशी देवी पार्वतीने भगवान मुरुगनला तारकासुर नावाच्या राक्षसाला आणि त्याच्या सैन्याला मारण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. थायपुसम हा सण त्या आनंदात साजरा केला जातो.

युगांडामध्ये चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू

युगांडामध्ये नवीन वर्षाच्या उत्सव सोहळ्यात गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात 9 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सागितले की, ही घटना कंपाला येथील फ्रीडम सिटी मॉलमध्ये मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी लोकांना मॉलच्या बाहेर बोलावण्यात आलेले होते. असे प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...